mla pramod jathar press conference in kudal sindhudurg 
कोकण

'ठाकरे सरकारने सिंधुदुर्गवासियांना कोवळा काढून हाती दिला आवळा'...

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) :  ठाकरे सरकारने सिंधुदुर्गवासियांच्या हक्काचे  दोनशे कोटी रूपये काढून घेतले ते परत करावे. या सरकारने कोवळा काढून आपल्या सर्वांच्या हाती आवळा देण्याचे काम केले. या सरकारचा मी जाहीर निषेध करीत आहे, असे भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनाचे जागतिक संकट असतानासुद्धा फक्त या सरकारने वीस लाख रुपये खर्च केल्याचा आरोपही त्यांनी केला.

श्री. जठार यांनी आज एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, राजू राऊळ, अविनाश पराडकर, बंड्या सावंत आदी उपस्थित होते. यावेळी श्री. जठार म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी कोकणात चक्रीवादळ झाले. यावेळी ठाकरे सरकारने कोकणसाठी 25 कोटी रुपये जाहीर केले. वास्तविक पाहता जिल्हा नियोजनमधील 100 कोटी व चांदा ते बांदा योजनेतील 100 कोटी असे दोनशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्याचा विकासनिधी या सरकारने परत नेला असून या आमच्या हक्काच्या पैशातूनच त्यांनी 25 कोटी जाहीर केले. हे 200 कोटी जिल्ह्याला परत दिले पाहिजे ही आमची जिल्हावासीयांच्या वतीने रास्त मागणी आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT