कोकण

शिक्षक भरतीनंतर जुन्या शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - शाळांच्या सुगम - दुर्गम यादीचे सर्वेक्षण चुकीचे झाले आहे. जिल्हातंर्गत बदलीत अन्याय झाला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावला पाहिजे. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना चांगली शाळा देण्यासाठी जुन्या शिक्षकांना दुर्गम शाळेत पाठवण्यात आले असून येऊ घातलेल्या शिक्षक भरतीनंतर जुन्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्‍वासन म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिले.

रत्नागिरीत झालेल्या प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, उपाध्यक्ष राजन कोरगावर, नंदकुमार राणे, शिक्षण सभापती सहदेव बेटकर, अरविंद जाधव, पर्शुराम पेवेकर आदींसह शिक्षक सदस्य उपस्थित होते. प्रस्तावना समितीचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार पंडित यांनी केली. याप्रसंगी सामंत म्हणाले , ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनेकांनी शाळा सुरू केल्या पण पटसंख्येचे कारण देत या शाळा बंद पाडल्या. त्यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायपीट वाढली आहे.

सध्या इंग्रजीचे प्राबल्य वाढत आहे. ज्यांनी मराठीतून डीएड पदवी घेतली आहे, त्यांना इंग्रजीतून शिकवणे अवघड जाते. त्यासाठी संघटनांनी पुढाकार घेऊन शिक्षकांसाठी इंग्लिश शिकवणीचे आयोजन केले पाहिजे. ज्ञानदानाचे पवित्र काम कारणाऱ्या शिक्षकांची अशैक्षणिक कामे वाढली आहेत. शासनाने त्यांच्यावर अनेक शाळाबाह्य कामांची जबाबदारी टाकली आहे. त्यात शिक्षक भरडला आहे. अशैक्षणिक कामे बंद झाली पाहिजेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांना बरोबर घेऊन विधानसभेत प्राथमिक शिक्षक समितीचे सर्व प्रश्‍न मांडणार आहे.

यावेळी समितीचे राज्य सल्लागार चंद्रकांत आणावकर यांनी प्राथमिक शिक्षक समितीचा संघर्षमय इतिहास, सद्यस्थितीतील शैक्षणिक धोरण व समाज अन्‌ शिक्षकांपुढील आव्हाने यावर संघटनात्मक मार्गदर्शन केले. 

तुमचे प्रश्न सोडवतील त्यांनाच पाठींबा द्या

शैक्षणिक चळवळीसाठी राज्य पातळीवर शिक्षक समितीने मागितलेला भूखंडासाठीचा प्रस्ताव माझ्याकडे द्या, त्याला तत्काळ मंजुरी देतो. शिक्षक समन्वय समितीवर सुनील साळवी आणि अरविंद जाधव यांची निवड करु. काही राजकीय नेते मतांसाठी संघटनेचा फायदा करून घेतात. अशा नेत्यांना वेळीच बाजुला सारा. जे तुमचे प्रश्‍न सोडवतील त्यांनाच पाठिंबा द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT