mla yogesh kadam interact with villagers in the affected village through social media 
कोकण

निसर्गवादळाने परिस्थिती गंभीर केली असली तरी सरकार आणि शिवसेना खंबीर आहे : योगेश कदम

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) :  नुकत्याच झालेल्या निसर्ग वादळाचा दापोली आणि मंडणगड तालुक्याला फार मोठा फटका बसला आहे. या दोन्ही तालुक्यातील अनेक गावे वादळामुळे उद्धवस्त झाली आहेत. वादळाच्या तडाख्याने वीजवितरण व्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली असल्याने या दोन्ही तालुक्यातील अनेक गावे दहा दिवसांनंतरही अंधारात आहेत. या दोन्ही तालुक्यांवर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र सरकार आणि शिवसेना खंबीर असल्याने तुमचे मोडून पडलेले संसार पुन्हा उभे केले जातील  हा विश्वास ठेवा अशा शब्दात दापोली-खेड-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी नुकसानग्रस्तांना धीर दिला आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त गावातील ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणले, ३ जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या वादळाने दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्याचे जे नुकसान केले आहे ते माझ्या आधीच्या व माझ्या पिढीनेही पाहिलेले नाही. गावेच्या गावे उद्धवस्त झाली आहेत. घर, गोठे, बागा, सारे काही भुईसपाट झाले आहे. विजेचे पोल उन्मळुन पडल्याने या दोन्ही तालुक्यातील अनेक गावे अंधारात आहेत. वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

स्थानिक कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने सातारा, कोल्हापुर येथून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधील कर्मचारीही वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात गुंतले आहेत. मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की साऱ्यांचेच प्रयत्न तोकडे पडत आहेत. वादळामध्ये सारे काही हरवून बसलेल्या ग्रामस्थांच्या मदतीला महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना धावली आहे. सरकारच्या माध्यमातून गावागावात केरोसिन, अन्नधान्याचे वाटप केले जात आहे.

शिवसेनेच्या माध्यमातुन  नुकसानग्रस्तांना प्लास्टिक आणि चादरीची मदत दिली जात आहे. शासनाकडून दिली जाणारी मदत नुकसानग्रस्तांपर्यंत विनासायास पोहचते की नाही याकडे मी स्वतः बारकाईन लक्ष ठेवून आहे. नुकसान ग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी नुकसानग्रस्त ग्रामस्थांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यातील सुमारे २०० गावांना वादळाचा फटका बसला आहे.

मी दरदिवशी प्रत्येक गावात जावून तिथल्या नुकसान ग्रस्तांशी संवाद साधतो आहे. एका दिवसात मला केवळ दहा ते १२ गावांमध्येच जाणे शक्य होत आहे. मात्र मी सर्व गावांमध्ये येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी खचून जावू नये, झालेल्या नुकसानीमुळे परिस्थिती गंभीर असली तरी सरकार आणि शिवसेना खंबीर आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी  धीर सोडू नये असे आवाहन योगेश कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT