mlus hevale pool swept away in the floodwaters 
कोकण

प्रशासनाचा कारभार सुशेगाद, शेवटी नको ते झालच, ग्रामस्थ त्रस्त

प्रभाकर धुरी

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - अनेक वर्षांचा लढ्याचा इतिहास असलेला मुळस हेवाळे पूल (कॉजवे) अखेर वाहून गेला. पुलावरील पाणी ओसरल्यावर ते लक्षात आले. पुलाचा जवळपास अर्धाअधिक भाग पाण्याच्या प्रवाहामुळे नाहीसा झाला. काही दिवसांपुर्वी पुलाचा कोसळलेला भाग तात्पुरता दुरुस्त केला होता; मात्र ती मलमपट्टीही कुचकामी ठरली. पुलाअभावी गावकऱ्यांना गावात जाण्यासाठी आता रामेश्‍वराचा फेरा मारावा लागणार आहे. 

तिलारी पाटबंधारे प्रकल्पाने खरारी नदीवर मुळस हेवाळे जोडणारा कॉजवे बांधून लोकांच्या येण्या जाण्याची व्यवस्था केली होती. पूल कमी उंचीचा आहे. शिवाय पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे झुजे लोबो यांची आई, त्यांच्या म्हैशी आणि अप्पासाहेब आत्माराम देसाई आणि अप्पासाहेब दत्ताराम देसाई यांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे अधिक उंचीच्या नव्या पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. शासनदरबारी पत्रव्यवहार झाले. चर्चा, भेटी झाल्या. जयवंतराव देसाई, झुजे लोबो आणि स्थानिक ग्रामस्थांनी पुलासाठी चळवळ उभी केली होती. तत्कालीन आमदार शिवराम दळवी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी पुलाचे आश्‍वासन दिले. 

निधी मिळालाच नाही 
नाबार्डमधून पुलासाठी निधी मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले; मात्र त्यातील एक रुपयाही पुलासाठी मिळालेला नाही. साहजिकच त्या पुलाने पाण्याच्या वेगवान प्रवाहासमोर तग धरला नाही आणि तो अर्धाहून अधिक वाहून गेला. पुलाचे पाईप शाबूत आहेत. त्यावरील सुमारे पंचवीस - तीस मिटर लांबीचा कॉंक्रीटचा थर पाण्याबरोबर वाहून गेला. तिलारी यांत्रिकी विभाग आणि गावकऱ्यांनी वाहून गेलेल्या भागात नदीतील गोटे पसरवून दोन्ही भाग जोडून तात्पुरती वाहतूक सुरु केली आहे; मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहात ते टिकेल याची शाश्‍वती नाही.

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare Viral Photo Controversy : रुपाली चाकणकरांनंतर आता सुनील तटकरेंही गोत्यात? 'त्या' फोटोने वाढवलं टेन्शन! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवणार?

अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, शेवटच्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेतलं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रि‍पदाचा राजीनामा

Video: 6.6,6,6,6... KKR च्या युवा फलंदाजाने IPL पूर्वीच शतक करत दाखवली ताकद; प्रतिस्पर्ध्यांना रहावे लागेल अलर्ट

MSRTC: एसटीला दिलासा! दरवर्षी २४१ कोटींची बचत होणार, उत्पन्न वाढीसाठी परिवहनमंत्र्यांचा मोठा निर्णय

Pune समलैंगिक संबंधांना विरोध, २१ महिन्यात २ अल्पवयीनांची हत्या; २२ वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT