Mobile tower van needed for communication in ratnagiri 
कोकण

केळशीची दुर्दशा ; संपर्कासाठी हवी मोबाईल टॉवर व्हॅन...

मकरंद पटवर्धन.

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील केळशी गावासह अन्य गावांना वेगवेगळ्या संस्था, शासनाच्या माध्यमातून मदत मिळू लागली आहे. पाण्यासाठी पेट्रोलवर चालणे पंप, जनरेटर, ड्रील, वेल्डिंग, कटर आदी सामग्री गावात पोहोचून काम सुरू झाले. परंतु अनेकांचा रोजगार हिरावला असून त्यांना उदरनिर्वाहासाठी योजना आखावी लागेल. पुढील 10 ते 15 वर्षांत सारी गावं उभी करण्याकरिता नियोजनबद्ध विकासाचे टप्पे ठरवावे लागणार आहेत, असे प्रतिपादन केळशी येथील महेश परांजपे यांनी दिली.


 परांजपे म्हणाले, मोठ्या शेतकर्‍यांचेही 100 टक्के नुकसान झाले असून छोट्या शेतकर्‍यांचेही तेवढेच भरून न येणारे नुकसान झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्यसाठा, घरातील सार्‍या वस्तूंचेही बरेच नुकसान झाले आहे. वीज नसल्याने पंपाने पाणी मिळू शकत नाही. सार्वजनिक पाणी योजना ठप्प आहेत. काही जणांना पागोळीचे पाणी गाळून, उकळवून प्यावे लागत आहे.
बंद घरे व तेथे न राहणार्‍या लोकांची कठीण स्थिती आहे. कारण सार्‍यांचेच नुकसान झाल्याने त्यांना कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतूनही मदतकार्य सुरू आहे. शेतीवर अवलंबून सारे व्यवहार ठप्प आहेत. घर बांधणी करणार्‍यांना आता काम आहे. जनजीवन सुरळित व्हायला, उद्योगधंदे, नेहमीची कामे सुरू व्हायला काही महिने लागतील.


गावच्या नातेवाइकांना भेटण्याची ओढ सार्‍यांना आहे. एखादा कोणीतरी गावात जाऊन येतो व ख्यालीखुशाली कळवतो. त्यामुळे संपर्कासाठी मोबाईल टॉवर व्हॅन किंवा तत्सम उपाययोजना केल्या पाहिजेत. ओएफसीद्वारे असलेली बीएसएनएलची सेवा सुरळित झाल्यास इंटरनेटसेवासुद्धा मिळेल. त्याद्वारे आवश्यक ती मदत पोहोचवणे शक्य होईल. बँकेने कनेक्टिव्हिटी असणार्‍या ठिकाणी जाऊन पैसे गावात आणून देण्याची सुविधा निर्माण करावी, अशी अपेक्षा परांजपे यांनी व्यक्त केली.

कोरोनाचा धोका ध्यानी घ्यायला हवा

अनेक ठिकाणांहून संस्था, व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू असून त्यांच्या मदतीबद्दल तीळमात्र शंका नाही. परंतु सध्या कोरोना महामारी पाहता सार्‍यांनीच आवश्यक ती सर्व काळजी घेतली पाहिजे. गावातील ज्येष्ठ मंडळी, मुलांना सांभाळले पाहिजे. आधीपासून आजारी असणार्‍यांची जास्त काळजी घ्यावी, असे आवाहन महेश परांजपे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT