Model Of Wooden Truck To Wish Happy Birthday Ratnagiri Marathi News  
कोकण

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बनवले हुबेहूब लाकडी ट्रकचे मॉडेल 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाला वाढदिवसाला भेट देण्याकरिता मित्राने चक्क ट्रकचे लाकडी मॉडेल बनवण्यास सांगितले. हे मॉडेल रत्नागिरीतील हरहुन्नरी कलाकार कारागीर संतोष माचकर आणि त्यांचा सुपुत्र रोहित माचकर यांनी या हुबेहुब बनवले. कोरोना लॉकडाऊनच्या काळातही या कलाकारांनी घरबसल्या हे सुरेख मॉडेल साकारले. 

सुतार समाजातील माचकर कुटुंबीय उत्तम कलाकार असून आतापर्यंत त्यांनी लाकडापासून अनेक कलाकृती साकारल्या आहेत. रत्नागिरीतील हरहुन्नरी व्यक्तीमत्व कलाकार, गौरांग आगाशे यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मित्र पराग सावंत यांना वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी हे ट्रकचे मॉडेल संतोष माचकर यांच्याकडून बनवून घेतले. 

खऱ्या ट्रकला जे बाहेरील सुटे भाग दिसतात, ते सर्व भाग या मॉडेललाही आहेत. सर्वच्या सर्व ट्रक अगदी जसाच्या तसा तयार केला आहे. ट्रकची चेसी, हौदा, चाके, मागची व पुढची बाजू, आतील रचना, अगदी काचेवरील वायफरही अगदी जसेच्या तसे बनविले आहेत. माचकर पितापुत्रांचे हे कसब पाहून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकही भारावला. अत्यंत बारकाईने, अभ्यासपूर्वक व कारागिरी पणाला लावून काम केले आहे. ट्रकचे हेडलाईट सुरु होतात आणि इंडिकेटर चमकतात. 

मिरजोळे एमआयडीसीमधील त्यांच्या विश्वकर्मा डेकोरेटर्समध्ये हा ट्रक बनवण्यास किमान पाऊण महिना लागला. यासाठी त्यांनी अगदी बारकाईने अभ्यास केला. सुरवातीला ट्रकचे फोटो काढले. मग फुटाला इंच अशी लांबी घेऊन हे हुबेहूब ट्रकचे मॉडेल बनवले. खरा ट्रक साडेबत्तीस फूट असून लाकडी ट्रकची लांबी साडेबत्तीस इंच आहे. ट्रक तयार झाल्यावर रंगकामात रत्नागिरीतील मूर्तीकार, मेकअपमन नरेश पांचाळ, प्रथमेश व चिन्मय पांचाळ यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT