monkey locked with the help of village people in kudal sindhudurg 
कोकण

स्थानिकांच्या सहकार्याने अखेर माकड झाले जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : पिंगुळी धुरीटेंबनगर येथे भरवस्तीत माकडांनी उच्छाद मांडत काहीजणांवर माकडांनी हल्ला केला. याची तत्काळ दखल घेत वनविभाग आणि कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्‍यू फोरम, सिंधुदुर्ग यांनी माकडाला जेरबंद करून रेस्क्‍यू ऑपरेशन यशस्वी केले. गेले 5 ते 6 दिवस धुरीटेंबनगर येथे मनुष्यवस्तीत माकडांचा उपद्रव सुरू होता. या माकडाने अरुणा अरुण धुरी, विजया विलास धुरी, सुलक्षणा भदू धुरी यांच्यावर हल्ला करून पायाचा चावा घेतल्याने त्या वैद्यकीय उपचार घेत आहेत. 

या हल्यात प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या इतर महिलांवरही या माकडाने हल्ला केल्याने त्यांनाही वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीती होती. स्थानिक अनंत धुरी यांनी याची माहिती कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्‍यू फोरम, सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनिल गावडे यांना वनविभागाला दिली. या माकडाला स्थानिकांच्या सहकार्याने अखेर जेरबंद करण्यास कोकण वाईल्ड लाईफच्या टीमला व वनविभागाला यश आले. या माकडाला वैद्यकीय उपचासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

यावेळी वनरक्षक श्री. सावंत, कोकण वाईल्ड लाईफचे अध्यक्ष अनिल गावडे, वेंगुर्ले प्रतिनिधी नाथा वेंगुर्लेकर, उपसरपंच सागर रणसिंग, मिलिंद धुरी, विष्णु धुरी, दिपक गावडे, विशाल धुरी, रूपेश धुरी, विनय येरम, सौमिल धुरी, केतन पिंगुळकर, मिलिंद धुरी, शिवराम (आबा) धुरी, संतोष धुरी, आबा वारंग आदी उपस्थित होते.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

Gokul Election: आमचे उमेदवार कोल्हापुरात ठरतात; सतेज पाटील

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

LPG Cylinder Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर LPG सिलिंडरचे काय झाले? सणासुदीआधी नवे दर जाहीर; आता कितीला मिळतोय?

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

SCROLL FOR NEXT