Parshuram Ghat Chiplun esakal
कोकण

Monsoon Update : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! परशुराम घाटातून प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा..

परशुराम, पेढे गावाला दरडीचा धोका आजही कायम असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार संरक्षक भिंती बांधण्यात आलेल्या नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

सलग दोन दिवस झालेल्या पावसात दोनदा किरकोळ स्वरूपाच्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.

चिपळूण : तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाला चांगली सुरवात झाली आहे. या पावसात (Monsoon) परशुराम घाटात (Parashuram Ghat) किरकोळ स्वरूपात दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडून लागल्या आहेत.

घाटातील सिंगल लेनचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे. गेल्या ३ वर्षांपासून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम रखडले होते; मात्र यावर्षी पावसाळ्यापूर्वी घाटातील डोंगरकटाई पूर्ण झाली असून काँक्रिटीकरणाचा एकेरी मार्ग पूर्ण झाला आहे.

परशुराम घाटाची लांबी सुमारे साडेतीन किमी आहे. चौपदरीकरणातील बहुतांशी कामे मार्गी लागल्यानंतर पहिल्या पावसाळ्यात दरडीचा धोका जाणवू लागला आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसात दोनदा किरकोळ स्वरूपाच्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.

चिपळूण हद्दीतील सरंक्षक भिंतीची कामे मार्गी लागली असली तरी महाड हद्दीतील कामे झालेली नाहीत. जेथे मातीचा भराव आहेत तेथे प्लास्टिकचे आच्छादन टाकण्यात आले आहे. एखाद्या वेळेस दरड कोसळल्यास जेसीबी, पोकलेन, ग्रेडर व डंपरची व्यवस्था आहे. शनिवारी महाड हद्दीत असलेल्या परशुराम घाटात काही डोंगरातील काही दगड रस्त्यावर आले होते.

मात्र, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. डोंगर कटाईनंतरच्या पहिल्याच पावसात दगड माती कोसळण्याचा धोका असल्याने दरडीच्या बाजूने सिंगल लेनवरून वाहतूक सुरू ठेवली आहे. घरांच्या सुरक्षेसाठी सरंक्षक भिंत उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती; मात्र त्यास सुरुवात झालेली नाही. महाड हद्दीतील सरंक्षक भिंतीची कामे अपूर्ण राहिल्याने दरडीचा धोका कायम आहे.

काँक्रिटीकरणाच्या महामार्गावर पहिल्याच पावसात वालोपे येथे खड्डा पडला. त्यामुळे काही ठिकाणी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह आहे. परशुराम, पेढे गावाला दरडीचा धोका आजही कायम असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार संरक्षक भिंती बांधण्यात आलेल्या नाहीत. दुर्गवाडी येथील तसेच परशुराम आणि पेढे परिसरातील जवळपास ६० ते ७० घरांना दरडींचा धोका कायम आहे.

-गायत्री जोगळे, सरपंच, प्रणित गुरव, उपसरपंच-परशुराम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT