Vikramgad Rain esakal
कोकण

Vikramgad Rain : विक्रमगड तालुक्यात 459.6 मि.मी पावसाची नोंद; नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा तुटला संपर्क

पावसाचा जोर असाच राहिला, तर भातपीक कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

अमोल सांबरे

तालुक्यातील अनेक नदी आणि नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोरया उलटल्याने काही गावांचा काही काळ संपर्क तुटला होता.

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात (Vikramgad Rain) गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने येथील नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. आज दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने विक्रमगड तहसीलमध्ये 459.6 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, भात लावणी केलेली भात शेती पाण्याने भरली असल्याने पावसाचा जोर असाच राहिला, तर भातपीक कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. तालुक्यातील अनेक नदी आणि नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोरया उलटल्याने काही गावांचा काही काळ संपर्क तुटला होता.

आज सकाळी शिळ-देहर्जे व कुंर्झे - ब्राम्हणगाव मार्गावरील देहर्जे नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील संपर्क काही काळ तुटला होता. तसेच विक्रमगड तालुक्यातील काही छोटे पूल काही वेळ पाण्याखाली गेले होते. तर, पुलावरून पाणी गेल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT