more four corona patients in ratnagiri 
कोकण

ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी चार जणांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्ह्यात एक दोन नव्हे तर आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरी 1, दापोली 1, खेड 1 आणि चिपळूणमध्ये 1 यांचा समावेश आहे. त्यामध्ये एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा समावेश असून इतर तीन मुंबईकर चाकरमानी आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे शहरात पुढील काही दिवस बंधने लागू करण्यात येणार आहे. तर इतर तीन जण हे मुंबईकर चाकरमानी आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. वाढणारे बहुतांश रुग्ण मुंबईकर चाकरमानी आहेत. परंतु नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दापोलीतील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाइकाला कोरोनाची लागण झाली आहे. नागरिकांनी घरीच थांबावे. विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केले आहे.

जिल्ह्यात मुंबईहून येणार्‍यांमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे एकुणच चित्र आहे. त्यात चार तारखेपासून जिल्ह्यात ऑरेंज झोन म्हणून अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात सुमारे 60 ते 70 टक्के परिस्थिती पुर्वपदावर आल्याप्रमाणे नागरिक बाहेर पडत आहेत. रुग्णांची संख्या कालपर्यंत 17 होती आता ती 21 पर्यंत गेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा सवलती देण्याचा निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे परिस्थितीच सांगत आहे. त्यावर आता फेर विचार करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT