most people restrictions on yourself then fight corona 
कोकण

'अमेरिकेत नागरिकांनी स्वतःवर बंधने घातल्यास कोरोना आटोक्यात'...

गोविंद राठोड

खेड (रत्नागिरी) : भारतासारखी कडक बंधने येथे नसल्यामुळे बाहेर जाता येते. पण भारतीय शक्यतो बाहेर पडत नाहीत. कारण कोरोनाची भिती प्रत्येकाच्या मनात आहे. अमेरिकेतील नागरिकांनी स्वतःवर बंधने घातली तर खुप प्रमाणात कोरोना आटोक्यात येवू शकतो. बाहेरून घरी आल्यानंतर गाडी जंतुविरहीत (सॅनिटाईज) करून स्वच्छ करणे, हात धुणे या गोष्टी कराव्या लागतात. त्या आम्ही कटाक्षाने पाळतो, अशी माहिती न्युयॉर्क शहरातील अनुजा धारिया यानी दिली.


खेडमधील अनुजा धारिया सध्या अमेरिकेत न्युयॉर्क शहरात नोकरी करतात. त्यांनी त्यांचा भाऊ समित धारिया याच्या व मित्रांच्या मदतीने खेड शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजेसाठी एक लाख रूपये मदत दिली आहे. त्यानिमित्त कोरोना विषाणूबाबत तेथील सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच भारतातील उपाययोजना योग्य आहेत की त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे हे विचारले असता त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. 

अमेरिकेत सर्वत्र टाळेबंदी  नाही
अनुजा म्हणाल्या, अमेरिकेत सर्वत्र टाळेबंदी केलेली नाही. काही शहरामध्ये टाळेबंदी अंशतः आहे. शाळा, महाविद्यालये आणि सर्वच शैक्षणिक संस्था बंद असून ऑनलाईन शिक्षण हाच पर्याय उपलब्ध आहे. त्याद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांशी संपर्कात आहेत. शाळा कधी सुरू होतील हे नक्की सांगता येत नाही. पण सध्या ऑनलाईन शिक्षण हाच पर्याय आहे. सोशल डिस्टन्स पाळले जात आहे. आम्ही किराणा माल तसेच घरातील अत्यावश्यक बाबीच्या खरेदीसाठी बाहेर पडता येत नाही. पंरतु ऑनलाईन खरेदी हा चांगला पर्याय येथील सरकारने उपलब्ध करून दिला आहे. गरजेच्या वस्तू आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो.

 न्युयॉर्कमधून खेडसाठी दिले 1 लाख

बाहेर पडण्यावर फारशी बंधने आमच्यावर नाहीत. येथे सर्व प्रकारची हॉटेल्स बंद असल्याने बाहेरून पदार्थ विकत घेता येत नाहीत. घरातूनच आपल्या आवडीचे पदार्थ बनवावे लागतात. आपण घरी पदार्थ करत असल्याने त्याचे वेगळेपण आणि महाराष्ट्रीयन चव जीभेवर रेंगाळते हे सांगताना अभिमान वाटतो. खेडच्या नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सर्वांनी सुरक्षित रहा. कोरोनाला आपण घरात राहूनच हरवू शकतो म्हणून सर्वांनी घरात राहण्याचा सल्ला त्यांनी खेडवासीयांना दिला. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी टाळेबंदी काळात सुरू केलेल्या अन्नछत्राला व त्यांच्या अन्य सामाजिक उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT