mother and son going to other location accident and mother dead in ratnagiri sangameshwar 
कोकण

नियतीचा खेळ सारा ; लेकराच्या गाडीवरुन पडण्याच निमित्त, आईवर ओढवला मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्‍वर (रत्नागिरी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोनवी पुलाजवळील माभळे येथील गतिरोधकावर दुचाकीवरुन प्रवास करणारी महिला तोल जावून पडल्याने महिला ठार झाली. सुवर्णा सुरेश गोटल (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून अपघात शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास झाला.

खेड तालुक्‍यातील आवाशी येथील अक्षय व भाऊ श्रीकांत हे दोघे भाऊ दुचाकीने लांजा येते जात होते. अक्षयने त्याच्या मित्राची गाडी घेतली होती. प्रवासामध्ये अक्षयने आपल्या दुचाकीच्या पाठीमागे आई सुवर्णा हिला घेतले होते. खेड येथून निघालेल्या अक्षय आईला घेवून संगमेश्‍वर सोनवी पुलाच्या पुढे माभळे येथे गतिरोधकाजवळ सकाळी ९.१५ वा. आला असता त्याच्या मागे बसलेली आई सुवर्णा हिचा तोल गेल्याने ती रस्त्याच्या मध्यभागी उजव्या बाजूला तोल जावून पडली.

गाडीवरुन खाली पडल्याने तिच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली. श्रीकांत हा त्यांच्या पाठीमागून येत होता. तो तेथे आला असता अपघातात आईला गंभीर इजा झालेली पाहून त्याने व अक्षयने आईला रिक्षाने उपचारासाठी संगमेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिच्या डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने तिला संगमेश्‍वर येथे प्राथमिक उपचारानंतर रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी घेवून जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. 

अक्षय, श्रीकांत आणि आई सुवर्णा हे तिघेजण कार्यासाठी लांजा येथे निघाले होते. ते संगमेश्‍वर येथे आले असता हा अपघात घडला. सुवर्णा गाडीवरुन खाली पडली, तेव्हा ग्रामस्थांनी तिचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न केला. तसेच महामार्गावरुन येणाऱ्या गाड्यांना तत्काळ थांबविले. मात्र दुर्दैवाने पाठ सोडली नाही. तिच्या डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने तिचा मृत्यू झाला. या अपघाताची खबर पोलिस संतोष झापडेकर, कांबळे यांना मिळताच त्यांनी पंचनामा केला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : पशुवैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. पुन्नियमूर्ती नटेशन यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर

SCROLL FOR NEXT