mother daughter and son dead in dam one time after two days found dead bodies in ratnagiri chiplun 
कोकण

मरणातही आई मुलांची झाली भागिदारीन ; मायलेकरांवर एकाच वेळी काळाने घातला घाला

सकाळ वृत्तसेवा

चिपळुण (रत्नागिरी) : चिपळुण तालुक्यातील असुर्डे येथील धरणात तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली. असुर्डे येथील एकाच कुटुंबातील बहिण, भाऊ, आणि आई अशा तिघांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघेजण मृत्यूमुखी पडल्याने असुर्डे पंचक्रोशीत सन्नाटा पसरला आहे.

याबाबत घटनास्थळांवरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास असुर्डे धरणात हे तिन मृतदेह आढळून आले आहेत. मयुरी बाबाराम चौगुले (वय 35), हर्ष बाबाराम चौगुले (वय 11), शारदा बाबाराम चौगुले (वय 13) अशी त्यांची नावे आहेत. असुर्डे येथील चौगुले कुटुंबीय मंगळवारी सकाळी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी असुर्डे धरणाजवळ गेले होते. त्यावेळी यातील मुलाचा तोल धरणात गेल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याला काढण्यासाठी बहिण देखील पाण्यात गेली. मुलगी बुडत असल्याचे आई मयुरी चौगुले यांनी पाहीले. तशाच स्थितीत त्यांनी पाण्यात उडी घेत लेकरांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास यश आले नाही. 

धरणात तिघांचाही बुडुन मृत्यू झाला. धरणाशेजारी गोळा केलेला लाकूडफाटाही पडला होता. तर त्यांच्या एका पायात चप्पल होते. तर चप्पल पाण्याबाहेरच पडलेले होते. मयुरी चौगुले यांचे पती पंचायत समिती शिक्षण विभागात कार्यरत आहेत. तर त्यांच्या आणखी दोन मुली व सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेत शिक्षण घेतात. मंगळवारी या दोन्ही मुली कॉलेजला गेल्या होत्या. तर घरी आजोबा-आजी होत्या.

सकाळी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी गेलेले तिघेजण परतलेच नाहीत. म्हणून कुटुबीयांनी शोध मोहिम सुरू केली होती. वाडी, गावासह, असुर्डे, कुंभारखाणी आदी ठिकाणच्या नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते सापडले नाही. धरण परिसरात हे तिघेजण लाकडूफाटा गोळा करताना गुरे चरण्यास गेलेल्या लोकांनी त्यांना पाहीले होते. त्यानुसार असुर्डे धरणात रात्री त्यांचा शोध घेतला तिघांचे मृतदेह आढळून आले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT