The mountain collapsed zolambe konkan sindhudurg 
कोकण

डोंगराचा भाग कोसळताच भीतीने गाळण

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) -  सावंतवाडी तालुक्‍यातील असनिये, फुकेरी व दोडामार्ग तालुक्‍यातील झोळंबे गावांच्या सीमेवर मळावाडी येथील डोंगरातील बराचसा भाग आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झोळंबे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भलेमोठे दगड डोंगरात धोकादायक स्थितीत अडकले असून मुसळधार पावसात ते खाली कोसळण्याची शक्‍यता आहे. यामुळे फुकेरी-झोळंबे रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. 

गतवर्षी झोळंबे-दापटेवाडी येथे डोंगर खचून डोंगरातील माती मोठ्या प्रमाणात वाहून वस्तीत आली होती. तसेच असनिये-कणेवाडी येथे देखील भूस्खलन होऊन डोंगर रस्त्यावर आला होता. यामुळे घारपी गावचा संपर्क तुटला होता. काही वर्षांपूर्वी याच डोंगरात ब्लास्टिंग करून मोठ्या प्रमाणात दगडांचे उत्खनन केले होते. भविष्यात डोंगर कोसळण्याचा शक्‍यतेने डोंगर पायथ्याशी असलेल्या गावातील ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे हे काम बंद केले होते. 

आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास डोंगरातून दगड कोसळण्याचा मोठा आवाज पायथ्याशी असलेल्या असनिये व झोळंबे ग्रामस्थांनी ऐकला. ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता डोंगराचा भलामोठा भाग कोसळल्याचे निदर्शनास आले. डोंगरात सुमारे 200 फूट दगड खाली कोसळले आहेत. डोंगराच्या खाली मळावाडी असून येथे 4 घरे आहेत. आज पाऊस नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा पावसाच्या पाण्यासोबत डोंगरातील माती व दगड वस्तीत वाहून आले असते. 

डोंगराच्या वरील भागातून कोसळलेले भलेमोठे दगड डोंगराच्या मध्यभागी धोकादायक स्थितीत असून मुसळधार पावसात हे दगड केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मुसळधार पावसात दगड माती खाली आल्यास फुकेरी-झोळंबे रस्ता बंद होणार आहे. तसेच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील लोकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागणार आहे. फुकेरी वासीयांना खाली बांद्यात किंवा जिल्ह्यात येण्यासाठी हा एकमेव रस्ता असून वाहतूक सुरू असताना डोंगरातील दगड खाली आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. डोंगरातून दगड कोसळण्याचा परिसर हा सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यांच्या सीमेवर आहे. स्थानिकांनी याची कल्पना प्रशासनाला दिली आहे. मात्र सायंकाळ पर्यंत कोणीही वरिष्ठ अधिकारी याठिकाणी फिरकला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

डोंगरातून दगड कोसळल्याने हा भाग धोकादायक झाला आहे. सकाळी मोठ्या गडागडाटासह डोंगराचा भलामोठा भाग कोसळल्याचे मी प्रत्यक्ष ऐकले. माझ्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने डोंगरातील धोकादायक दरड तत्काळ हटवून याठिकाणी संरक्षित जाळी बसवावी.
- संतोष सावंत, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT