Movement shop traders sawantwadi konkan sindhudurg 
कोकण

...आता न्याय मिळेपर्यंत माघार नाही ः जाधव

रूपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - बाजारपेठेतील स्टॉल हटविल्याप्रकरणी पालिका प्रशासनाविरोधात येथील स्टॉल व्यावसायिक रवी जाधव यांनी आज येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाला मारायचं असेल तर पाठीवर मारा, कोणाच्या पोटावर नको, अशी विनवणी केली आहे. 
श्री. जाधव यांच्या उपोषणाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी पाठिंबा दिला आहे.

यावेळी जाधव म्हणाले, ""सणासुदीच्या काळात आपण विक्रीसाठी आणलेले सामान जप्त करून कचरा गाडीतून नेण्यात आले. आपण दलित समाजातील असल्यानेच आपल्यावर अन्याय करण्यात आला. तो स्टॉल व ती जागा कायमस्वरुपी व्यवसायासाठी मिळावी, यासाठी प्रशासनाकडे मागणी देखील केली होती. शिवाय उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता; मात्र उत्तरादाखल कोणत्याही आकसापोटी पालिकेकडून कारवाई केली नसल्याचे कारण पालिका प्रशासनाने पुढे केले आहे. आज जवळपास 90 हजाराचा माल पालिका गोडाउनमध्ये पडून आहे. त्यासाठी बॅंकेकडून काढलेले कर्जाचे हप्ते थकल्याने बॅंकेचे अधिकारी माझ्या दारावर येत आहेत. त्यामुळे आपल्यावर व्यवसाय करण्यापलीकडे कुठलाच पर्याय उरलेला नाही. 

न्याय मिळेपर्यंत माघार नाही 
जोपर्यंत पालिकेकडून न्याय नाही मिळत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही.'' शहरामध्ये दिवसेंदिवस अनधिकृत स्टॉल उभे राहत आहेत. त्यांना मात्र प्रशासनाकडून अभय देण्यात येत आहे; परंतु माझ्यासारख्या स्थानिकांवर पालिकेकडून अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Defeats Argentina Video : चक दे इंडिया..! भारताने संपवला नऊ वर्षांचा पदकाचा दुष्काळ ; ११ मिनिटांत चार गोल अन् अर्जेंटिना पराभूत

ECHS Treatment Rule: उपचार नियम बदलणार! नवे दर लागू होणार, आरोग्य मंत्रालयाने मोठा निर्णय, कुणाला फायदा होईल?

Winter Session 2025: भीक मागण्यावर येणार बंदी! दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर, राज्य सरकारचं नेमकं धोरण काय?

Plane lands on moving car Video : भयानक दुर्घटना!, विमान थेट भरस्त्यावरील धावत्या कारवरच झालं लँड अन्..

Jowar Shengole Recipe: हिवाळ्यात बनवा पारंपरिक पद्धतीने गरमागरम ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे!

SCROLL FOR NEXT