० 
कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी हालचाली गतीमान

विनोद दळवी

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हालचालींना आज अचानक वेग आला. सोमवारच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला सत्ताधारी भाजपचे तब्बल आठ सदस्य गैरहजर होते. सभा संपल्यावर आमदार नीतेश राणे यांनी अध्यक्ष दालनात भाजपच्या सर्व 31 सदस्यांची बैठक बोलाविली होती; मात्र यालाही आठ जण अनुपस्थित राहिले. त्यानंतर राणे यांनी उपस्थित सदस्यांना गाडीतून सुरक्षित ठिकाणी हलविले. शिवसेना सत्ता मिळवण्यासाठी जोरदार हालचाली करत असल्याने भाजपही शह देण्यासाठी सज्ज झाला आहे. 

समिधा नाईक यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी बुधवारी (ता. 24) निवडणूक आहे. सत्ताधारी पक्षाचे तत्कालीन गटनेते सतीश सावंत यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर समिधा नाईक अध्यक्ष झाल्या. त्यावेळी सावंत यांनी सत्तापरिवर्तन करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता; मात्र यश आले नव्हते. शिवसेनेने प्रयत्न सोडलेला नाही. बुधवारच्या निवडणुकीत चमत्कार घडवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. काही सदस्य गळाला लागल्याची चर्चा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आजच्या सभेला भाजपचे आठ सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे राजकीय हालचालींना गती आली. 

भाजपकडे 31 तर शिवसेनेकडे 19 सदस्य आहेत. भाजपकडे सध्या एकतर्फी बहुमत आहे; परंतु शिवसेनेला आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी सात सदस्य आवश्‍यक आहेत. आठ सदस्य अनुपस्थित होते. हा योगायोग की घडवून आणलेला प्रयत्न, हे समजू शकलेले नाही; मात्र यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. अनुपस्थितांमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी व मालवण तालुक्‍यातील सदस्यांची संख्या जास्त होती. हे सदस्य नेमके कोणत्या कारणासाठी उपस्थित राहू शकले नाहीत, हे मात्र समजू शकलेले नाही. भाजप मात्र सक्रिय झाला. आमदार राणे यांनी तातडीने हालचाली करत सदस्यांची बैठक बोलावली. यानंतर त्यांना घेऊन ते अज्ञातस्थळी रवाना झाले. 

मोबाईल स्विचऑफ 
आमदार राणे यांना काही सदस्यांबाबत संशय आल्याने त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दालनात उपस्थित असलेल्या भाजप सदस्यांना वाहनात बसवून राजकीयदृष्ट्या सुरक्षितस्थळी नेले; मात्र त्यानंतर यापैकी अनेक सदस्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणाचेही मोबाईल लागत नव्हते. 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT