MP Nilesh Rane criticizes on Chief Minister Uddhav Thackeray political marathi news
MP Nilesh Rane criticizes on Chief Minister Uddhav Thackeray political marathi news 
कोकण

'शिवसेनेत पदासाठी सर्व्हे आणि मतदान झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच काय पण पक्षप्रमुख राहणार नाही'

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग :  जुन्या शिवसैनिकांची ठाकरे सरकारमध्ये अवस्था इतकी वाईट झाली आहे की सभागृहात "आम्ही मेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार" असं बोलून गेले. उद्धव ठाकरे फक्त ३५ टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेत सर्व्हे आणि प्रमुख पदासाठी मतदान झालं तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाही. असा निशाना खासदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर साधला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेच्या वापराला दिवाकर रावते  यांनी विरोध केला होता. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दिवाकर रावते यांनी शिवसेनेला  धारेवर धरले होते. सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेचा वापर होतो हा प्रकार हास्यास्पद आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकही शब्द व्यक्त केले नाहीत अशी खंत दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत व्यक्त केली होती.

 रावते पुढे म्हणाले की, मी मेल्यावर साहेबांना भेटलो तर मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ असा संतापही त्यांनी व्यक्त केला. दिवाकर रावते यांच्या या विधानावरून माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

 निलेश राणे म्हणाले,उद्धव ठाकरे फक्त 35 टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसेनेचे सर्वे आणि प्रमुख पदासाठी मतदान झाले ते उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार नाही अशी टीकाही यावेळी निलेश राणे यांनी केली.

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT