कोकण

हरकुळ बुद्रुक शेखवाडीत खासदार राऊत यांची भेट

CD

84910

हरकुळ बुद्रुक शेखवाडीला
खासदार राऊत यांची भेट

नुकसानीची पाहणी, मदतीची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. २१ ः तालुक्यात १६ मे रोजी चक्रीवादळ झाले होते. या परिसराला खासदार विनायक राऊत यांनी आज भेट दिली. स्थानिक नागरिकांची भेट घेऊन भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथील वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या घरांना भेट देऊन पाहणी केली.
नुकसानग्रस्त घरांना तातडीची मदत म्हणून आपण पत्रे व कौले उपलब्ध करून दिली आहेत. तसेच प्रशासनासोबत आंबा बागायत व काजू आणि फळझाडे बागायतदारांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर बैठक घेऊन विशेष निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, हरकुळचे सरपंच बंडू ठाकूर, उपसरपंच आयुब पटेल, ग्रामपंचायत सदस्य नित्यानंद चिंदरकर, माजी सरपंच दिवाकर पारकर, सोसायटी संचालक बाबुल पटेल, आसिफ मुजावर, आनंद माडेश्वर, समद शेख, चांद शेख, बशीर शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते. हरकुळ बुद्रुक गावातील अनेक घराचे नुकसान झाले आहे. वीजप्रवाह खंडीत झाला होता. महसुलने पंचनामा केला आहे. मात्र, अद्याप नुकसान भरपाई मिळलेली नाही. त्यामुळे घरांची डागडुजी करण्यास अडचण येत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

Nagpur: वैद्यकीय पदवी घेणारी पत्नी मानसिक अस्थिर कशी; आयपीएस अधिकाऱ्याची याचिका फेटाळली

Nagpur: नवतपाच्या पहिल्याच दिवशी चटके; ब्रह्मपुरीचा पारा ४७.६ तर, नागपूर ४६.५ अंशांवर

Rwanda Economy: रवांडा : आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थव्यवस्था

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळ दूध संघात सतेज पाटील, मंत्री मुश्रीफांचे एकत्र पॅनेल? उघडउघड विरोध की अंतर्गत मैत्री जपणार

SCROLL FOR NEXT