MP Vinayak Raut How Came Form Mumbai In Lockdown  
कोकण

लाॅकडाऊनमध्ये मुंबईतून लोकप्रतिनिधी सिंधुदुर्गात येतात कसे? 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोन जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे मुंबईतून आलेल्या आमदार नितेश राणे यांनी स्वतःला होम कोरंटाईन करून घेतले; मात्र मुंबई रेड झोनमध्ये असतानाही तिथून आलेले खासदार विनायक राऊत, अतुल रावराणे हे जिल्ह्यात बिनदिक्कत फिरत आहेत. खासदार हुसेन दलवाई यांनीही आपली काही माणसे खारेपाटण येथे येऊन जिल्ह्यात पाठवली. त्यामुळे जनतेला एक न्याय आणि नेत्यांना दुसरा असे प्रशासनाने न करता अशा पद्धतीने फिरण्यास आळा घालावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. परशुराम उपरकर यांनी टीका केल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यापुरते ते जिल्ह्यात आले; मात्र लगेच मुंबईत परतले खरेतर त्यांनी मतदारसंघात राहून जनतेची काळजी घेणे अपेक्षित होते असेही परब यावेळी म्हणाले. येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सभापती नासीर शेख, गटनेते राजू बेग, नगरसेवक सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, ""सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. तोदेखील मुंबईतून आला होता; मात्र तो निगेटिव्ह ठरल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर आता 28 दिवस देखील होत आले आहेत. त्यामुळे आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्याच्या मार्गावर आहे; मात्र असे असताना मुंबईसारख्या हायअलर्ट भागात राहणारे खासदार राऊत, अतुल रावराणे यासारखे शिवसेनेचे नेते कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता कार्यकर्त्यांचा घोळका घेऊन जिल्ह्यात फिरत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई हे खारेपाटण पर्यंत येऊन आपली माणसे जिल्ह्यात पाठवत आहेत. अशा गोष्टींमुळे जिल्ह्याला धोका निर्माण होऊ शकतो व जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्यापासून पुन्हा लांबणीवर जाऊ शकतो यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करून अशा नेत्यांना जिल्ह्यात करण्यापासून आळा घालावा, जर त्यांना जिल्ह्यात राहायचे असेल तर त्यांना होम कोरंटाईन करून ठेवावे.'' 

बेळगाव व परजिल्ह्यातील काही भाजी निर्यात करणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे बेळगाव व परजिल्ह्यातील भाजी नागरिकांनी घेऊ नये. सावंतवाडी नगरपालिका हद्दीत गावठी भाजी विकण्यासाठी परवानगी दिली आहे. शहरात तशी व्यवस्थाही केली आहे. त्यामुळे नागरिकांनी गावठी भाजी विकत घ्यावी. तालुक्‍यातील आंबा विक्रेत्यांसाठी शिवउद्यान समोरील जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याठिकाणी आंबे विक्रेत्यांनी आंबे विकण्यास परवानगी आहे. 
- संजू परब 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT