मनसेचे सरचिटणीस आमदार परशुराम उपरकर  sakal
कोकण

खासदारांना रमेश गोवेकरांचा विसर : परशुराम उपरकर

आमदार नाईक यांच्यावर अकार्यक्षमतेची टिका

प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा

मालवण ः शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी असलेल्या भाई गोवेकरांचा भाऊ रमेश गोवेकर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गायब झाला. याबाबत आपण आमदारकीच्या काळात विधानसभेत सातत्याने आवाज उठविला; मात्र काल झालेल्या पत्रकार परिषदेत या भागातून निवडून आलेल्या खासदार विनायक राऊतांना अंकुश राणे आठवतो; पण रमेश गोवेकर आठवत नाही, ही शिवसेनेची एक शोकांतिकाच आहे, अशी टीका माजी आमदार, मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी बसस्थानक इमारतीचे भूमीपूजन झाले; मात्र त्याचे उद्घाटन केव्हा होणार? खड्डेमय रस्त्यांची दुरूस्ती करणे ही माझी जबाबदारी आहे, असे सांगणार्‍या आमदार वैभव नाईक यांनी दिवाळी आली तरी रस्त्यांच्या कामांना अद्याप सुरवात झालेली नाही. त्यामुळे आमदारांनी आपण अकार्यक्षम आमदार असल्याचे स्पष्ट करावे, अशी टीकाही श्री. उपरकर यांनी केली.

शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख विनोद सांडव, उपजिल्हाप्रमुख शैलेश अंधारी, विनायक गावडे, विशाल ओटवणेकर, गुरू तोडणकर, निखिल गावडे, देवेंद्र चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री. उपरकर म्हणाले, "केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी सध्या वैफल्यग्रस्त झाल्यासारखे वागत आहेत. केंद्र व राज्यातील सरकार हे जनतेला अडचणीत आणि महागाईचे चटके देण्यामागे आहे. आज पेट्रोल, डिझेल दरवाढीचे परिणाम एसटीवर तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर झाले आहेत. राज्य शासनाने हे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मुख्यमंत्री म्हणतात सामाजिक उपक्रमातील एसटी, बीएसटी मोठ्या प्रमाणात चालतात. त्यामुळे पेट्रोलचे दर वाढले. दुसर्‍या बाजूला युवासेनेचे कार्यकर्ते सायकल रॅली काढतात.

राज्याने इंधनावरील सेस कमी करावा यासाठीच त्यांचे हे आंदोलन आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. केंद्र सरकारच्या जीएसटीमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा अंतर्भूत करण्यास राज्याने विरोध केला. एकमेकांच्या विरोधात जनता होरपळत आहेत. जनतेला त्याचे चटके बसताहेत. सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पुन्हा त्रुटी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षीची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने या महाविद्यालयाला मान्यता घेण्यापूर्वी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात नंतरच परवानगी घ्यावी. हे करत असतानाच मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पीटल कधी उभारणार? हेही जाहीर करावे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT