mrs. india globe queen priyanka kamble giripunje khed marathi news 
कोकण

देशातील 22 सौंदर्यवतींना मागे टाकत खेडची सुकन्या झाली मिसेस इंडिया ग्लोबन क्विन 

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी)  : तालुक्‍यातील चिंचघर प्रभूवाडी येथील डॉ. मुरलीधर शांताराम कांबळे यांच्या द्वितीय कन्या प्रियंका कांबळे-गिरीपुंजे या मुंबई येथे झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेत मिसेस इंडिया ग्लोबन क्विनच्या मानकरी ठरल्या. स्पर्धेत देशातील 22 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी त्यांनी मिसेस शायनिकंग स्टार हा किताबसुद्धा जिंकला होता. या स्पर्धेच्या तयारीसाठी नागपूर येथील डॉ. वर्तिका पाटील यांनी मार्गदर्शन करून सराव करून घेतला. तसेच त्यांचे पती अनुराग गिरीपुंजे यांच्या पाठबळामुळे हे यश संपादन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मॉडेलिंगची आवड असलेल्या प्रियंका कांबळे-गिरीपुंजे या सध्या भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पावर शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी कोरोना योद्धा म्हणूनही काम बजावले आहे. 

प्रियंका कांबळे-गिरीपुंजेंचे यश
प्रियंका हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खेड शहरातील एल. पी. इंग्लिश स्कूलमध्ये झाले. उच्च माध्यमिक शिक्षण भडगांव-खोंडे येथील ज्ञानदीप विद्यामंदिरमध्ये झाले. त्यानंतर सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामधून तिने स्थापत्य अभियंता ही पदवी संपादन केली. हे सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यात यश मिळविले आणि मंत्रालय मुंबई येथील जलसंपदा विभागात गेली चार वर्षे तिने सहाय्यक अभियंता म्हणून काम पाहिले.

या दरम्यान नागपूर येथील अनुराग गिरीपुंजे यांच्याशी विवाह झाला. त्यांना साडेतीन वर्षाची एक मुलगी आहे. विवाहित असलेल्या 30 वर्षीय प्रियंका हिने संपूर्ण देशातील मानाचा पुरस्कार मिळविल्याने ती निश्‍चितच कौतुकास पात्र ठरली आहे. 

संपादन-अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावचे गजानन महाराज संस्थान, १ कोटी ११ लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीत

Asian Games 2026 : नवी मुंबईच्या Harita Bhadra ने ०.०१ सेकंदाच्या फरकाने जिंकले पदक; आहे भारताची दुसरी सर्वात वेगवान धावपटू

Election Commission controversy: मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाण यांची ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी

चीन अमेरिकन कंपन्यांचे AI तंत्रज्ञान चोरत आहे का? पाहा 'डिस्टिलेशन' म्हणजे काय? ज्यावरून USA अन् China मध्ये रंगलाय वाद...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT