MSEDCL has made available the facility of Missed Call and SMS to the consumers through mobile 
कोकण

मिस्ड कॉलचा लाभ घेतला तब्बल 785 वीज ग्राहकांनी : खंडित वीजपुरवठा याद्वारे सुरू

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाइलद्वारे ‘मिस्ड कॉल’ आणि ‘एसएमएस’ची सोय महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेला कोकण वासियांनी प्रतिसाद दिला आहे. गेल्या २३ दिवसांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील ७८५ वीजग्राहकांनी मिस्ड कॉल सुविधेचा वापर करून वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

आधुनिक जीवनाशी सुसंगत व अत्यंत सुलभ सेवा देण्यासाठी महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गेल्या एप्रिलमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात ‘लॉकडाऊन’ सुरु असल्याने ही सेवा वीजग्राहकांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे.

प्रामुख्याने कोकणात वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळे गेल्या २३ दिवसांत राज्यभरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या एकूण एक लाख ३९ हजार ७५१ तक्रारी महावितरणचे मोबाअल अॅप, वेबसाइट, टोल फ्री क्रमांक आदींद्वारे मिळाल्या. त्यापैकी ३८ टक्के म्हणजे ५३ हजार १६० तक्रारी वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’च्या सुविधेचा वापर करून, तर एक हजार ५८३ तक्रारी ‘एसएमएस’ द्वारे नोंदविल्या. त्यामध्ये कोकण विभागातील ७८५ ग्राहकांचा समावेश आहे. आता पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारींची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक ग्राहकांनी मिस्ड कॉलद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत स्वतःच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२-६१०७८५०० या क्रमांकावर वीजग्राहकांना मिस्ड कॉल देता येईल. ‘

एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी मात्र ग्राहक क्रमांकासोबत मोबाइल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी असणे आवश्यक नाही. कोणत्याही मोबाइल क्रमांकावरून ‘एसएमएस’द्वारे तक्रार नोंदविता येईल. मात्र १२ अंकी ग्राहक क्रमांक अचूक देणे आवश्यक आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाइल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल. तसा ‘एसएमएस’ वीजग्राहकांना पाठविण्यात येईल. याशिवाय www.mahadiscom.in वेबसाइट, मोबाइल अॅप तसेच सतत सुरू असलेल्या कॉल सेंटरच्या १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार स्वीकारण्यात येत आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Water Crisis : राज्यावर महादुष्काळाचे संकट! फक्त ८५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; शेतीसाठी पाणीपुरवठा बंद, अनेक शहरांत पाणीकपात

Nitesh Rane Attacks Abhijit Dipke : 'कॉकरोच पार्टी'चा कोणताच प्रभाव नाही, नितेश राणेंनी अभिजीत दिपकेंना फटकारलं

Dhule: गोव्यात साधू बनून लुबाडणारे तिघे अटकेत; धुळे तालुका पोलिसांची बायपासवर कारवाई; संशयित गुजरातचे

Jalgaon: सहायक अधिकारी, दोन लेखापरीक्षक तीस हजारांची लाच घेताना जाळ्यात; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

E20 ते E100 इंधनावर धावणारी वॅगनआर बायोफ्लेक्स, किंमत किती?

SCROLL FOR NEXT