MSEDCL warn for hit 93 large and 187 small entrepreneurs in the district konkan marathi news 
कोकण

महावितरण कंपनीचा इशारा ; उद्योजकांनो बिल भरा नाहीतर वीज होईल कट

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : महावितरण कंपनीने जिल्ह्यातील 93 मोठ्या आणि 187 छोट्या उद्योजकांना दणका दिला आहे. 280 उद्योजकांकडून सुमारे 16 कोटी 29 लाख थकबाकी असून ती लवकरात लवकर भरावी, अन्यथा वीज जोडणी तोडणार, अशी नोटीस बजावली आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने कठोर पावले उचलली आहेत. 

कोरोना महामारीने महावितरण कंपनीलाही अडचणीत आणले आहे. लॉकडाउनमुळे सर्व ठप्प झाले होते. अनलॉकनंतर महावितरण कंपनीने सलग तीन महिन्याची ग्राहकांना बिले दिली; मात्र बिलांचा आकडा पाहून अनेक ग्राहक चक्रावले. वाढीव बिलाचा विषय त्यानंतर सुरू झाला ते अजूनही गाजत आहे. विरोधी पक्षांनीदेखील याबाबत आवाज उठवला आणि बिलं न भरण्याचा अनेक ग्राहकांनी निर्धार केला. वसुलीवर याचा मोठा परिणाम होऊन महावितरणसमोर थकबाकीचा डोंगर उभा राहिला. आर्थिक संकटात महावितरण आल्यामुळे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणची थकीत बिलं भरा, असे आवाहन केले. 

कठीण परिस्थितीतून उभे राहण्यासाठी महावितरण कंपनीनेही कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. मोठ्या थकबाकीदारांना नुकतीच नोटीस बजावली आहे. जिल्ह्यातील 93 मोठ्या उद्योजकांची 12 कोटी 89 लाख थकबाकी आहे तर 187 छोट्या उद्योजकांची 3 कोटी 40 लाख थकबाकी आहे. एकूण 280 उद्योजकांची 16 कोटी 29 लाख थकबाकी आहे. या ग्राहकांना वीज बिल भरण्याबाबत महावितरण कंपनीने नोटीस बजावली आहे. बिल भरा अन्यथा जोडणी तोडणार असा इशारा दिला आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुजोरा 
महावितरण कंपनीने कठोर कारवाईची पावले उचलल्याने वीज जोडणी तोडण्याच्या भीतीने ग्राहकांनी बिल भरण्यास सुरवात केली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला. थकबाकी वसुलीचे प्रमाण वाढल्यास महावितरणची परिस्थितीही सुधारेल. ग्राहकांना चांगली सेवा देता येईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. 

93 मोठ्या उद्योजकांची 12 कोटी 89 लाख थकबाकी 
187 छोट्या उद्योजकांची 3 कोटी 40 लाख थकबाकी 
एकूण 280 उद्योजकांची 16 कोटी 29 लाख थकबाकी  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT