Mumbai Goa Highway Contractor Company Changes Names Of Villages
Mumbai Goa Highway Contractor Company Changes Names Of Villages  
कोकण

मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदार कंपनीने `या` गावांच्या नावाचे घातले बारसे 

सकाळवृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - मुंबई - गोवा महामार्गावरील असणाऱ्या बहुतांशी गावांच्या नावांचे बारसे एका ठेकेदार कंपनीने चुकीच्या नावाने केले असून याबाबत तात्काळ बदल करावा, अन्यथा 3 मे नंतर निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सुधारणा व रुंदीकरण उपक्रमांतर्गत एका ठेकेदार कंपनी कंत्राटदारामार्फत काम प्रगतिपथावर आहे. या कार्यादरम्यान कंपनीने गावांच्या संदर्भात लावलेले दिशादर्शक नामफलक हे सदोष पद्धतीने लावलेले आहेत. त्यासंदर्भातील या आधी आपल्या दालनातील संयुक्त बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वास्तविक महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार नाम फलक इंग्रजीसह स्थानिक राज्य भाषेतून लावणे बंधनकारक असून देखील या कंपनीने हे फलक गुगलद्वारे चुकीच्या नावाने लावलेले आहेत.

आपले गाव व त्याचे नाव हा आमच्यासाठी अभिमानाचा अस्मितेचा विषय असल्याने या नामफलकात तात्काळ सुधारणा करण्यात यावी, अन्यथा 3 मे नंतर प्रशासनास कोणतीही पूर्वकल्पना न देता निषेध आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे लोकांच्या भावनेचा उद्रेक झाल्यास संचारबंदी कायद्यानुसार साथरोग निर्मूलन कायद्याचे उल्लंघन झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपलीच राहील. जिल्हा प्रशासनाने ती वेळ आणू नये. याची कृपया नोंद घ्यावी, अशी मागणी श्री. गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

या गावांची चुकली नावे 

महामार्गावरील बहुसंख्य गावंची नावे चुकीची लिहिली गेली आहेत. यात अनुक्रमे बरोबर नावे व कंसात चुकीची लिहिली गेलेली नावे अशी ः ओरोस (औरस), अणाव (आनाव), आवळेगाव (आवलेगाव), मांडकुली (मडंकुळी), पणदूर (पांडूर) अशा प्रकारचे बहुतांशी गाव आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT