मुंबई-गोवा महामार्गावर धुक्‍याची झालर  sakal
कोकण

Raigad News : थंडीचा जोर वाढल्‍याने मुंबई-गोवा महामार्गावर धुक्‍याची झालर

दोन दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून गारठा वाढला

सकाळ वृत्तसेवा

Poladpur News : दोन दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून गारठा वाढला आहे. तालुक्यात महामार्गासह घाटमार्गावर धुक्याची झालर पसरल्‍याने वाहनांचा वेग मंदावला आहे. हवेत दुपारी १२ वाजेपर्यंत गारवा जाणवत असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्‍या दिसतात.

थंडीची लाट उसळल्‍याने तालुक्यातील अनेकांनी ठेवणीतील उबदार कपडे वापरात काढले आहेत. तर बाजारपेठ, महामार्गालगत लोकरीचे कपडे विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. थंडीमुळे आरोग्‍याची काळजी घेत सकाळी व्यायाम करणाऱ्या व फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

तसेच सैन्य, पोलिस दलात भरती होण्यासाठी मुले-मुली सराव करताना दिसतात. शीतपेयांची मागणी कमी झाली असून चहाची टपरी, कॉफी पिण्यासाठी नागरिकांची पावले वळू लागली आहेत.

ग्रामीण भागात थंडी अधिक असल्याने नागरिकांकडून नाक्यानाक्यावर शेकोटी पेटवण्यात आल्‍याचे दिसते. पुढील महिनाभरात थंडीची लाट आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. महामार्गावरील राजेवाडी फाटा तर राज्य मार्गवरील वरंध, माझरी वाघजाईसह महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट, वाडा-कुंभरोशी आदी मार्ग, डोंगररांगावर धुक्याचे आच्छादन पसरले दिसते. दृश्‍यमान कमी झाल्‍याने चालक संथ गतीने वाहने चालवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT