Mumbai-Goa highway jammed because The pain subsided in Kashedi Ghat 
कोकण

ब्रेकिंग - कशेडी घाटात दरड कोसळली ; मुंबई -गोवा महामार्ग ठप्प

सिध्देश परशेटये

खेड (रत्नागिरी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. 

कोकणात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज रात्री साडेआठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात महामार्गावरील धामणदेवी गावाच्या हद्दीत ही दरड कोसळली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. आज रात्रभर दरड उपसण्याचे काम सुरू राहणार आहे. अशी माहिती घटनास्थळावरुन प्राप्त झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस लाँक डाऊन असल्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असलेला तुळशी विन्हेरे मार्ग देखील प्रशासनाने बंद  केलेला आहे. त्यामुळे वाहनचालकांचे मात्र हाल होणार आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT