Video Viral Sakal
कोकण

रस्त्याची अवस्था पाहून कोकणी माणूस भडकला! नेत्यांचे उपटले कान; मध्यरात्रीचा Video Viral

मध्यरात्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दत्ता लवांडे

रत्नागिरी : कोकणातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची अवस्था पाहून कोकणातील एका तरूणाने सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. तर मध्यरात्री महामार्गावर व्हिडिओ शूट करून कोकणवासियांना आवाज उठवण्यास सांगितलं आहे. त्याने हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

"मी मुंबईवरून कोकणात माझ्या गावी चाललोय. मी लांजा आणि राजापूरच्या मध्ये मुंबई गोवा हायवेवर उभा आहे. हा महामार्ग गेल्या १० ते १२ वर्षापासून बनवला जात आहे. तुम्ही हा रस्ता बघा आणि सांगा हा रस्ता गाड्या चालवण्याच्या लायकीचा आहे का? ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारित हा रस्ता येतोय त्या अधिकाऱ्यांना माझा पश्न आहे की, रस्त्यावरील या डोंगरावरून लोकांनी गाड्या काढायच्या कशा? गेल्या दहा वर्षापासून तुम्ही रस्ता बनवताय पण तुम्हाला कसलीच लाज वाटत नाही." अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

"कोकणी माणसाला सुद्धा असाच रस्ता मिळायला पाहिजे कारण त्यांना आवाज उठवता येत नाही. असा रस्ता जर पश्चिम महाराष्ट्रात असता तर आत्तापर्यंत तिकडच्या आमदारांनी विधानसभा दणाणून सोडली असती. पण कोकणातले आमदार या रस्त्यावरील टोलनाके आपल्याकडे कसे येतील याचा विचार करत आहेत पण यांना कोकणातील लोकांचा काहीच विचार येत नाही."

"आत्ताही कोकणी माणसाला हात जोडून विनंती आहे की जागे व्हा. आपण किती दिवस असे रस्ते सहन करायचे? लोकांना जर कोकणात यायचं असेल तर पुणे कोल्हापूर मार्ग वापरतात पण या राष्ट्रीय महामार्गावरून येत नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाहीये. ज्यांना तुम्ही निवडून देता ते तुमच्यासाठी कोणताच आवाज विधानसभेत उचलत नाहीत."

कोकणातल्या मुलांना मुंबईला जावं लागतं ना त्याला हे नेते कारणीभूत आहेत. या सगळ्याच्या विरोधात आपण उभा राहिलं पाहिजे नाहीतर पुढचे दहा वर्षे हा महामार्ग होणार नाही अशा शब्दांत या तरूणाने संताप व्यक्त केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SC Rejected Walmik Karad Bail : सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मीक कराडला सुप्रीम कोर्टाचा दणका

Nagpur : चोर सोडून संन्याशाला शिक्षा! महिलेवर हल्ला करणारा मारकुटा वळू राहिला बाजूला, दुसऱ्यालाच पकडलं; नागपूर महापालिकेचा अजब कारभार

Video : हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घडवला इतिहास! लाँच केले मिनी सॅटेलाईट; शेतीसाठी ठरेल उपयुक्त, अभिमानास्पद व्हिडिओ व्हायरल

सचिन पिळगांवकरांबद्दल स्पष्टच बोलले गिरीश ओक, म्हणाले... 'रिकामटेकड्या लोकांचा उद्योगच ट्रोलिग...'

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, सोमय्या दाम्पत्याला दणका

SCROLL FOR NEXT