sakal
कोकण

मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि कारचा अपघात

दोन ठार, तीन गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि कारचा अपघात झाला. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. महामार्गावरील पोलादपूर ग्रामीण रुग्णालयापासून काही अंतरावर हा अपघात झाला. मुंबई - गोवा महामार्गाचे ठिकठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर ती अनेक ठिकाणी डायव्हर्शन देण्यात आलेले आहेत. पोलादपूर नजीक सर्व्हिस रोड आणि महामार्गावरील दोन मार्गिका या दरम्यान जिथे सर्वच वाहनचालकांचा गोंधळ उडतो त्याच ठिकाणी हा अपघात झाला. 

खेड हून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बस ला अंबरनाथ हून संगमेश्वर तालुक्यातील साखरप्याच्या लगत असलेल्या भोवडे या गावी येणाऱ्या मोटार कार ने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की या धडकेत शिवशाही बस च्या चालकांच्या साईड चा टायर जागीच फुटला. या

अपघातात कार मधील जयवंत सावंत (वय - ६०, रा. अंबरनाथ), किरण घागे (वय - २८, रा.घाटकोपर ) हे दोघे मयत झाले आहेत. तर गिरीश सावंत ( वय - ३४), जयश्री सावंत ( वय - ५६ ) दोघेही राहणार अंबरनाथ, अमित भितळे ( वय - ३०, रा. बदलापूर ) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट,जहीर शेख अडचणीत; तरुणीच्या नव्या तक्रारीने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar:भविष्यात कागदी नोटांऐवजी डिजिटल कॅश; ‘सीबीडीसी’च्या व्यवहारासाठी इंटरनेटचीही आवश्यकता नाही

मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींचा कायमचा थांबणार लाभ; मेपासून पात्र महिलांनाच दरमहा १५०० रुपये, ‘या’ वेबसाईटवर पाहा तुमचे नाव, वाचा...

Marathwada News: मराठवाड्यातील जलसाठा प्रकल्पांत ५५ टक्के उपयुक्त पाणी; जायकवाडी ५८% भरलेले

Chhatrapati Sambhajinagar: हर्सूल तलावामध्येचार युवकांचा मृत्यू ; दोन मित्रांसह तिघे बुडाले, तर एकाने मारली उडी

SCROLL FOR NEXT