कोकण

Chiplun Update - वाशिष्ठी नदीवरील पूल कोसळला; मुंबई-गोवा हायवे बंद

मुंबई गोवा महामार्गावरील हा ब्रिटीशकालीन महत्त्वाचा पूल होता.

मुझफ्फर खान

चिपळूण : बहादूर शेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील (vashisthit river) धोकादायक पुल अखेर आज पहाटे कोसळला. अतिवृष्टीमुळे (heavy rain) हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता त्यामुळे सावित्री नदीवरील पुल कोसळल्यानंतर झालेल्या सारखी घटना घडली नाही. मुंबई गोवा महामार्गावरील हा ब्रिटीशकालीन महत्त्वाचा पूल होता. आज पहाटे पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. (chiplun flood update)

गेले दोन दिवस या पुलावरून पाच ते सहा फूट पाणी सतत वेगाने वाहत होते हा पूल जुन्या काळातील ब्रिटिशकालीन होता नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई-गोवा (mumbai-goa highway) महामार्गावरील वाहतूक सुरू होती आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला परंतु आज पहाटेच्या सुमाराला या पुलाचा काही भाग वाहून गेला त्यामुळे पुलाचा भगदाड पडल्यासारखे दृश्य दिसून आले. (konkan rain update)

राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाला धोकादायक जाहीर केले होते. पुलाच्या दुरुस्तीसाठी विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून तसेच राजकीय नेत्यांकडून सतत पाठपुरावा सुरू होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेजारील नव्या पुलाचे काम सुरू आहे तेही कासव गतीने सुरू आहे त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI New Rule: RBI चा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून ऑनलाइन पेमेंटचे नियम बदलणार! आता ही गोष्ट केल्याशिवाय पेमेंट होणार नाही...

IPL 2026 Marathi News: लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला 'तो' यंदा RCB चा भाग नाही; फ्रँचायझी म्हणते, त्याच्यासोबतचा करार...

"म्हणून स्वप्नीलने मला 1000 रुपये दिले" ; अभिनेत्याने सांगितला खास किस्सा, म्हणाला..

Iran-Israel War: युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून भारताला तेलाची बंपर ऑफर; 'अशी' होणार डील...

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

SCROLL FOR NEXT