mumbai sakal
कोकण

मुंबईतील तरुण-तरुणी करत आहेत देवरुख गोकुळ बालीकागृहाला मदत

मिरॅकल संस्थेकडुन मदत मिळत होती

प्रमोद हर्डीकर

साडवली : हल्लीची तरुणाई समाजातील प्रश्नांकडे सजगतेने आणि जागरुकतेने पहात आहे याचे अनेक किस्से समोर येत आहेत.असाच एक किस्सा देवरुख मातृमंदिर संचलीत गोकुळ बालीकागृहाबाबत घडला आहे.

गोकुळ बालीकागृहासाठी शासनाचे नियम काटेकोरपणे पाळुन दरमहा ८० हजार रुपये खर्च येतो.यासाठी मिरॅकल संस्थेकडुन मदत मिळत होती.माञ सन २०२१ पासुन हि मदत मिळणे बंद झाले. सध्या ११ मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.हि बाब संस्था पाहणीसाठी आलेल्या अंजली माने यांना कळली.अंजली माने यांनी आपणही समाजाचे एक घटक आहोत,आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या जाणिवेतुन त्या काम करित असलेल्या टीसीएस कंपनीतील आपल्या युवा मिञ- मैञिंनींना ही बाब सांगितली.

या युवक युवतींनी मिरॅकल नावाचाच ग्रुप तयार केला व जानेवारी २०२२ पासुन प्रत्येकी दरमहा रुपये २०० रुपये काढत खात्यात रक्कम भरत राहिले.अशाने दरमहा ५ ते ६ हजार रुपये जमा होत गेले.सप्टेंबर महिन्यात ही पुंजी ५१ हजाराची झाली. हि मदत गोकुळ बालगृहासाठी देण्यात आली.तरुणाई मध्ये समाजभान अजुनही पहायला मिळत आहे.मिरॅकल ग्रुप अजुनही मदत मिळवुन देण्यासाठी कटिबद्ध आहे.या मिरॅकल ग्रुपच्या सर्व सदस्यांचे अभिजित हेगशेट्ये व सतीश शिर्के यांनी आभार मानले आहेत.या अशा घटनांमुळे समाजात अशाच तरुण तरुणींना प्रेरणा मिळेल व त्यांच्यातही समाजभान जागरुक होणार आहे.नवीन तंञज्ञान वापरुन समाजासाठी धडपडणारी नवीन पिढी उदयास येत आहे हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT