Municipality Removed Encroachments in Chiplun esakal
कोकण

Chiplun News : चिपळुणात मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई; अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाने (Chiplun Municipality) गुरूवारी कारवाईचा बडगा उगारला.

सकाळ डिजिटल टीम

शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तत्काळ हटवण्यात यावीत, अशा सूचना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी बैठकीदरम्यान संबंधित विक्रेते, व्यावसायिकांना केल्या होत्या.

चिपळूण : शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्‍या अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाने (Chiplun Municipality) गुरूवारी कारवाईचा बडगा उगारला. दिवसभर केलेल्या या कारवाईने शहरातील रस्त्यांवर बस्तान बांधलेल्या विक्रेत्यांचे चांगलेच दणाणले. या कारवाईमुळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

अतिक्रमण हटाव पथकाने केलेल्या या कारवाईत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे (Prasad Shingte) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांचे प्रमुख, कामगार सहभागी झाले होते. या कारवाईदरम्यान रस्त्यालगतच्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. शहरात वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तत्काळ हटवण्यात यावीत, अशा सूचना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी बैठकीदरम्यान संबंधित विक्रेते, व्यावसायिकांना केल्या होत्या; मात्र व्यावसायिकांमध्ये काहीच बदल झाला नाही.

दिवसेंदिवस अतिक्रमणांचा विळखा वाढतच होता. याबाबत व्यावसायिकांना समज देऊनही रस्त्यावरच ठाण मांडून असल्याने गुरूवारपासून प्रत्यक्षात ही अतिक्रमण विरोधातील कारवाई हाती घेण्यात आली. सकाळपासूनच शहरातील भाजीमंडई, भेंडीनाका या परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, मंगेश पेढांबकर, अतिक्रमण हटाव पथकाचे संदेश टोपरे, विनायक सावंत, सचिन शिंदे, रमेश कोरवी, नगर अभियंता प्रणव खताळ, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, वलिद वांगडे, राजेश जाधव, संतोष शिंदे यांच्यासह सफाई कामगार व कर्मचारी सहभागी झाले होते.

या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मालाचा पालिकेच्या आवारात ढीग पडला होता. डंपर व जेसीबी अशा यंत्रणेमार्फत शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवण्यात आली. अनेक व्यावसायिकांनी आपल्या टपरीभोवती लाकडी शेड उभारल्या होत्या. त्या तोडण्यात आल्या. काही हातगाड्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे काही व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वाहतूक कोंडीची समस्या गंभीर

आता नाताळनिमित्त बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. त्यातच रस्त्यालगत होणाऱ्या अतिक्रमणामुळे किरकोळ अपघातही घडत आहेत. शिवाय चिपळूण शहरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT