कोकण

कुणकावळे येथील खून प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - सुनेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सासू सुचिता सुरेश देसाई (वय 60), सासरे सुरेश गोपाळ देसाई (वय 66) व चुलत सासरे अनिल गोपाळ देसाई (वय 62, सर्व रा. कुणकावळे) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश 2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यानी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील संदिप राणे यांनी काम पाहिले. 

26 जूनला मृत काव्या गोपाळ देसाई (वय 27) ही जेवण आटोपल्यानंतर सासू सुचिता व 5 महिन्यांची मुलगी आरोही यांच्या सोबत घराच्या वळइत झोपली होती. तर पती गोपाळ, सासरे सुरेश व चुलत सासरे अनिल हे अन्यत्र झोपले होते.

दरम्यान, 27 ला सकाळी काव्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा गळा दाबला गेल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल दिला होता. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार पती गोपाळ सुरेश देसाई, सासरा सुरेश गोपाळ देसाई (वय 66), सासू सुचिता सुरेश देसाई तसेच चुलत सासरा अनिल गोपाळ देसाई या चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार गोपाळ याला 29 ला अटक झाली होती.

5 जुलै पर्यंतच्या पोलिस कोठडी नंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्यायलयीन कोठडी मंजूर झाली होती. त्यानंतर त्याने जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. अद्याप तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर या प्रकरणी संशयित आरोपी गोपाळ यांच्या आई, वडील व चुलत काका यांच्यावरही संगनमत केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याला अटक होऊ नये, यासाठी उर्वरित तिन संशयित आरोपींनी (मृताचे सासू, सासरे) येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

SCROLL FOR NEXT