Mustard tank should be allowed to supply water kokan marathi news 
कोकण

टंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येत पडली भर अन्...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी  : टँकरसाठी मागणी वाढत असून जिल्हा परिषद, महसूलची यंत्रणा कोरोनाच्या कामकाजात गुंतलेली आहे. त्यामुळे सरसकट टँकरना पाणीपुरवठा करण्यास परवानगी दिली जावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.


जिल्ह्यात उन्हाची काहीली वाढत असतानाच जिल्ह्यातील टंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येत दर आठवड्याला भर पडत आहे. चिपळूण, लांजा, खेडमधील 11 गावातील 19 वाड्यांना चार टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. सुमारे दोन हजार ग्रामस्थांचा पाण्याची गरज भासत आहे. वातावरणातील गर्मी अत्यंत वाढलेली आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असून बाष्पीभवनाने पाण्याचे साठे कोरडे पडू लागले आहेत. परिणामी दरवर्षीप्रमाणे यंदाही टँकरची मागणी वाढत आहे. गेल्या आठवड्यात तीन गावे आणि पाच वाड्यांची भर पडली असून एक टँकरही वाढलेला आहे. सध्या नऊपैकी तीन तालुक्यांनाच याची झळ बसत आहे. भविष्यात यामध्ये आणखीन वाढत होत जाणार आहे.

हेही वाचा- तब्बल 295 दिवसांनी येथे झाले तीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन ...
अनेक गावांमधून टँकरसाठी मागणी येत असली तरीही त्याला मान्यता देण्याच्या प्रक्रियेला उशिर लागत असल्यामुळे लोकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आलेली आहे.  यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष बने यांनी जिल्हाप्रशासनाला निवेदन देऊन यावर तोडगा काढला आहे. जिल्हयात ठराविक वाड्यांना पाणी टंचाई जाणवत आहे. कोरोना महामारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनात अनेक चाकरमानी कोकणात अडकून पडले आहेत.

लॉकडाऊनमुळे त्यांचा जाण्या-येण्याचे सर्व मार्ग शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचा वापरही तेवढाच वाढलेला आहे. टँकर मागणीसाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सुचना येत आहेत. त्यांना तातडीने पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु तालुका व जिल्हास्तरावरील महसुल, जिल्हापरिषद यंत्रणा कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेत गुंतलेली आहे. प्रस्ताव आले की तहसिलदार व गट विकास अधिकारी पाहणी करतात आणि त्यानंतर पुरवठा होतो. टंचाई आराखडयातील ज्या ठिकाणी पाणी पुरवठयाची योजना राबवुन कार्यान्वीत करण्यात आली आहे आणि जेथे पाणी पुरवठा नियमित सुरळीत व पुरेसा आहे अशी टंचाई आराखडयातील ठिकाणे वगळून उर्वरित वाडयांमध्ये टँकरने पाणी सुरु करण्यास विनातपासणी परवागनी दिली जावी असे नमुद केले आहे.

   तालुका     गावे       वाड्या
* चिपळूण       6         13
* लांजा         1            1
* खेड          11         19
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT