My Family My Responsibility campaign completed he survey of 9 lakh 69 thousand 299 people in the ratnagiri district  
कोकण

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी : रत्नागिरीत साडे नऊ लाखात १४३ कोरोना पॉझिटिव्ह तर 169 सारीचे रुग्ण सापडले

राजेश कळंबट्टे

रत्नागिरी : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 69 हजार 299 जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यामध्ये अतिगंभीर आजार असलेले (कोमोर्बिड) 76 हजार 684 रुग्ण असून त्यांची काळजी घेण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. कोरोनाशी निगडीत लक्षणे असलेल्या 598 जणांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 143 पॉझिटिव्ह तर 169 सारीचे रुग्ण सापडले.


आरोग्य विभागाकडून घरोघरी तपासणी सुरु केली आहे. सर्व्हेक्षणाची आकडेवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जाहीर केली नव्हती. बुधवारी (ता. 30) मंत्र्यांच्या ऑनलाईन आढावा बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी मोहिम प्रभावीपणे सुरु असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात 4 लाख 40 हजार 572 घरातील 15 लाख 42 हजार 612 लोकांची तपासणी करण्याचे लक्ष आहे. तपासणीसाठी 1,602 गावात 686 पथके असून 2,026 कर्मचारी नियुक्त केले आहेत. 15 सप्टेंबरनंतर आतापर्यंत 62.77 टक्के सर्व्हेक्षण झाले. त्यात 2 लाख 76 हजार 560 कुटूंबातील 9 लाख 69 हजार 299 लोकांची तपासणी केली.  

यामध्ये ‘सारी’ रोगाची लक्षणे असलेले 169 रुग्ण आढळले. त्यात शहरातील 57 तर ग्रामीण भागातील 112 रुग्ण आहेत. सर्दी, खोकला, ताप लक्षणे असलेले 1070 रुग्ण, कोमॉर्बिड म्हणजेच कोरोनासाठी अतिगंभीर ठरणारे (उदा. मधुमेह, ह्यदयरोग यासारखे) रुग्ण 76 हजार 684 आहेत. एकुण सर्व्हेक्षणातील 721 रुग्णांची कोरोना तपासणी केली. त्यातील 143 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांमध्ये ग्रामीण भागातील 120 रुग्ण असून शहरातील रुग्ण 23 आहेत. चिपळूण, संगमेश्‍वर, खेड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत. शहरी भागातही चिपळूण पालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या अधिक आहे.

* सारी व कोरोना बाधित रुग्ण  

   तालुका      कोरोना       सारी
* मंडणगड      0           10
* दापोली        0            2
* खेड          20          26
* गुहागर         1           10
* चिपळूण      56          30
* संगमेश्‍वर     28           1
* रत्नागिरी      10          0
* लांजा           2          2
* राजापूर         3         31

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT