NCP-Shivsena Esakal
कोकण

राष्ट्रवादी - शिवसेना प्रचाराचा नारळ फुटला; देवगडातून सुरुवात

राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार दौऱ्याला सुरूवात

सकाळ वृत्तसेवा

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूकीतील (Nagar Panchayat Elections) प्रचाराने वेग घेतला आहे. राष्ट्रवादी-शिवसेना (NCP, Shiv Sena)आघाडीच्या उमेदवारांचा आजपासून प्रचार दौरा सुरू झाला. ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे (Nandkumar Ghate) यांच्यासह आघाडीच्या कार्यकर्त्यांनी किल्ला येथील श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचे श्रीफळ वाढवले.

नगरपंचायत निवडणूकीत भाजप, काँग्रेस स्वतंत्र लढत असून शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यातच अपक्षांचा भरणा असल्यामुळे निवडणूकीतील चुरस वाढली आहे. आज येथील किल्ला येथील श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन आघाडीच्या उमेदवारांनी प्रचाराचा प्रारंभ केला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे, निरीक्षक नीलेश गोवेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बंटी कदम, तालुका सरचिटणीस शरद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब, वसंत मोहिते, जयराम कदम, बौध्दजन विकास मंडळाचे अध्यक्ष विजय कदम, आनंद देवगडकर, उमेदवार मिताली सावंत, किरण कांबळी, निवृत्ती उर्फ बुवा तारी यांच्यासह अन्य उपस्थित होते.

सुरूवातीला गणपती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर देवगड बुध्दविहार तसेच किल्ला मारूती मंदिरात जावून दर्शन घेण्यात आले. जनतेच्या मनातील विकास करण्याचा आपला मानस आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यावर भर दिला जाईल असे उमेदवारांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी पक्ष निरीक्षक श्री. गोवेकर यांनी, देवगड जामसंडे शहरातील राष्ट्रवादीच्या दोन्ही जांगासह शिवसेना आघाडीच्या सर्व जागा विजयी होतील असा विश्‍वास व्यक्त केला. नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे उमेदवार विजय संपादित करून नागरिकांना अपेक्षित असलेला विकास घडवतील असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT