कोकण

'केंद्राने मदत न केल्यास राज्याने द्यावी'

तौक्ते वादळामुळे रत्नागिरीत झालेल्या नुकसानीची पटोले यांनी पाहणी केली

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : केंद्र सरकार (central government) जरी वादळ नुकसानग्रस्तांना मदत करत नसले तरी मुख्यमंत्र्यांनी (CM uddhav thackrey) वेळ प्रसंगी कर्ज काढून चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना मदत करावी अशी विनंती कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना केले आहे. सध्या ते कोकण दौऱ्यावर (kokan tour) आहेत. तौक्ते वादळामुळे रत्नागिरीत झालेल्या नुकसानीची पटोले यांनी पाहणी केली. रत्नागिरीतील (ratnagiri) नुकसानीची पाहणी केल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, कोकणाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणातील लोकांना पुन्हा उभे केले पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला (maharashtra) मदत नाही दिली तरी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कोकणवासियांना मदत द्यावी. कर्ज घ्यावे लागले तरी चालेल पण लोकांना भरीव मदत करा, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले आहे. तसेच वस्तुस्थिती आणि तिजोरी पाहून मुख्यमंत्री नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

दौऱ्यादरम्यान पटोले यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला केला. भाजपने राजकारण सुरू केले आहे. ही वेळ राजकारण करत बसण्याची नाही. अडचणीत आलेल्या लोकांना मदत कशी करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. नैसर्गिक आपत्तीत केंद्राने मदत केलीच पाहिजे. केंद्राच्या तिजोरीत महाराष्ट्राचा 40 टक्के हिस्सा जातो हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले. गुजरातला (gujrat) एक हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला दोन हजार कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी काहीच मदत केली नाही. पंतप्रधान काय फक्त गुजरातचे आहेत का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

एकीकडे लोकांना मारायचे आणि दुसरीकडे जागतिक पातळीवर ज्या गोष्टी बॅन आहेत त्यांची विक्री करायची असला प्रकार सुरू आहे. लोकांच्या जिवाशी खेळू नका, ही माझी विरोधकांना विनंती आहे. कोट्यवधी लोक मरण पावले आहेत. आपल्या देशात अशी परिस्थिीती कधीच नव्हती. देश स्मशान करण्याचे काम भाजपने केले आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Kolhapur LPG Tanker Accident : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर LPG Gas टँकर पलटी; चालक जागीच ठार, रात्री 10 नंतर 'या' मार्गावरील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Shendurwada Crime : अपहरण करून चालकास बेदम मारहाण; वाळुज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT