nanar project issue jayendra parulekar press conference sawantwadi konkan sindhudurg 
कोकण

"नाणार'बाबत प्रभूंनी मौन सोडावे ः डॉ. परुळेकर

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - "शिळ्या कढीला ऊत आणून' आणि रोजगाराचे गाजर दाखवून नाणार सारखा कोकणच्या जैवविविधतेला धोकादायक असलेल्या प्रकल्पाचे समर्थन काही पक्षाचे प्रमुख आणि स्थानिक पदाधिकारी करीत आहेत. विधानसभा संपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणारबाबत बोलताना या प्रकल्पाला नाणार ऐवजी ग्रीन रिफायनरी म्हणा, असे सांगून हा प्रकल्प कोकणात होणार नसल्याचे सूचक विधान केले. तरी 4 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचे निकटवर्तीय सुरेश प्रभू यांनी नाणारबाबत मौन सोडून भूमिका मांडावी, असे मत शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले. 

येथील पालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली सावंत आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. परुळेकर म्हणाले, ""मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना काळात वाढलेल्या बेरोजगारीबाबत सरकारकडे मुद्दे मांडले. यात कोकणातील बेरोजगारीबाबत बोलताना नाणार प्रश्‍नांचे त्यांनी समर्थन केले. विधानसभेची सभा संपल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नाणारबाबत प्रश्‍न विचारला असता हा नाणार प्रकल्प नसून त्याचे नाव ग्रीन रिफायनरी म्हणा असे सांगितले. यावरून नाणार प्रकल्पाबाबत त्यांचा विरोध कायम असल्याचे त्यांनी यावेळी दाखवून दिले.'' 

ते म्हणाले, ""नाणार प्रकल्पाला सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील तेथील 8 ग्रामपंचायतीचा विरोध आहे. त्यातील 3 ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच झाल्या. या तीनही ग्रामपंचायतीवर नाणार विरोधी असलेले संघर्ष समितीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत नागरिकांचा विरोध मावळला, असे समजणे चुकीचे ठरू शकते. नाणार प्रकल्प म्हणजे केवळ पैशाचाच कारभार आहे. कोकणातून 4 वेळा लोकसभा निवडून आलेले नाणार प्रकल्पावरील मौन सोडून भूमिका मांडण्याची गरज आहे. 

प्रभूंची भूमिका महत्त्वाची 
परुळेकर म्हणाले, की श्री. प्रभू हे कोकणच्या विकासाबाबत सर्व जाणून आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जातात. या प्रश्‍नावर त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. नाणार प्रकल्प हा रेड कॅटॅगरीतला आहे. हा प्रकल्प येथे आणावा, की न आणावा हा विचार करण्याची गरज आहे. कारण 2009 लोकसभा निवडणुकीत खासदार प्रभू हे लोकांना उद्देशून उभा सिंधुदुर्ग इकोसेन्सिटिव्ह करा असे बोलले होते. मग इकोसेन्सिटिव्ह जिल्ह्यात हा प्रकल्प कसा काय येऊ शकतो. 2009च्या त्या सभेत माजी खासदार निलेश राणे आणि विद्यमान आमदार नितेश राणे हे दोघे उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री घरात घुसून महिलेचे कपडे उचलणं बलात्काराचा प्रयत्न नाही, हायकोर्टाचा आरोपीला दिलासा

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT