nanar project in kokan marathi news 
कोकण

नाणार वाद पेटला ; भाजपच्या नेत्याचा गौप्यस्फोट....

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : नाणार रिफायनरीच्या मुद्‌द्‌यावरून प्रकल्प समर्थक आणि विरोधकांनी जाहीर सभांद्वारे शक्तिप्रदर्शन करीत एकमेकांना शाब्दिक ठोसे लगावले. "नाणारचा विषय आता संपला आहे' इथपासून "नाणार झालाच पाहिजे' इथपर्यंत प्रवास झाला. इथवर नाणारचा पहिला अंक संपला. नाणार परिसरामध्ये गुजरातींसह परप्रांतियांनी जागा खरेदी केल्याचा आरोप झाला. आता ठाकरे बंधूंच्या नातेवाईकांनी नाणार परिसरात जागा खरेदी केल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला. या गौप्यस्फोटाने नाणारच्या रणात वेगळे वळण लागले. 

तालुक्‍यातील नाणार परिसरातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर त्या अधिसूचनेची प्रकल्प विरोधकांनी होळी केल्यापासून खऱ्या अर्थाने "नाणार'चे रण पेटले. त्यानंतर गेली दोन वर्षे नाणार चांगलेच धगधगत आहे. विविध प्रकारची आंदोलने करणाऱ्या प्रकल्प विरोधकांनी नाणार हटावचा रेटा लावला. त्याला शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांचे पाठबळ मिळून विरोधाची धार अधिकच तीव्र झाली.

जठारांनी केला गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीच्या राजकीय सारीपाटादरम्यान शिवसेनेची सोबत मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये तत्कालीन भाजप शासनाने नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली. या घोषणेने नाणारला विरोध करणारे प्रकल्पग्रस्त, विविध संघटना आणि त्याला पाठबळ देणाऱ्या राजकीय पक्षांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. या घडामोडींमध्ये गुजरातींसह परप्रांतियांनी नाणार परिसरात जमिनी खरेदी केल्याचा आरोप सातत्याने केला गेला. यात शहा असल्याचे सांगितले गेले; मात्र त्याला काहीशी राजकीय किनार असल्याने तो मुद्दा चांगलाच गाजला; मात्र प्रकल्प समर्थकांच्या सभेमध्ये जठार यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने राजकीयदृष्ट्या सनसनाटी निर्माण झाली. 

वेळप्रसंगी पुरावे सादर करू.. 
समर्थकांच्या डोंगरतिठा येथील सभेमध्ये केलेल्या गौप्यस्फोटाच्या वेळी जठार यांनी ठाकरे बंधूंच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या असून वेळप्रसंगी त्याचे पुरावे सादर करू, असे सांगितले. आरोप-प्रत्यारोप सिद्ध करणे, त्याचे पुरावे सादर करणे आणि त्यानंतर गुन्हा मान्य करणे, वा न करणे, हे भविष्यात घडेल की, नाही हे येणारा काळ दाखवून देईल. नव्या आरोपाने नाणारच्या रणमैदानावर नवे वेगळे वळण आले. यातून नाणारचे रणमैदान कोणते वळण घेते आणि भविष्यात "नाणार राहणार की जाणार' याची मात्र सर्वसामान्यांना उत्सुकता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT