Nanasaheb Dharmadhikari Birth Centenary Chiplun Shri member 33 tons of garbage
Nanasaheb Dharmadhikari Birth Centenary Chiplun Shri member 33 tons of garbage sakal
कोकण

चिपळुणात 'श्री' सदस्यांनी उचलला ३३ टन कचरा

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवारी (ता. १) चिपळूण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी ८ वाजता सुरू झालेली साफसफाई दुपारी १ वाजता थांबली. या दरम्यान ४२२ श्री सदस्यांनी शहरातील मुख्य रस्त्यासह शासकीय कार्यालयांचा परिसर श्रमदानातून स्वच्छ केला. शहरातून तब्बल ३३ टन ओला व सुका कचरा या सदस्यांनी जमवून तो पालिकेच्या शिवाजीनगर येथील कचरा डेपोमध्ये टाकण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. चिपळूण तालुक्यातील ४२२ श्री सदस्यही या अभियानात सहभागी झाले होते. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता हे सर्व सदस्य शहरातील पालिकेसमोर जमले. अभियानाच्या प्रारंभप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती व शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा आणि प्रतिष्ठानच्या कामकाजाचा गौरव केला. तसेच त्यांचे अनुयायी सामाजिक जाणिवेतून विविध उपक्रम राबवत असल्याने श्री सदस्यांच्याही कामाचे विशेष कौतुक केले. गोळा झालेल्या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्यांसाठी पालिकेच्या घंटागाडीबरोबरच श्री सदस्यांनी ५ छोटा हत्ती, ३ ट्रॅक्टर व १ डंपरची व्यवस्था केली होती. सकाळी शहर परिसरात व शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.

शहरातील प्रांत ऑफिस, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे आदी ठिकाणांचा परिसर तसेच बहादूरशेख नाका, काविळतळी, युनायटेड इंग्लिश स्कूल मार्कंडी, चिंचनाका, चिपळूण नगरपालिका, काणे हॉटेल, बाजारपेठ मुख्य रस्ता, गांधीचौक, पानगल्ली आतील रस्ता, नाईक कंपनी, गुहागर नाका, पुन्हा गांधी चौकाकडे जाणारा रस्ता, त्यानंतर उक्ताड गणेशमंदिर परिसर, अर्बन बँक, परांजपे हायस्कूल गुहागरनाका, रंगोबा साबळे रोड मुख्य रस्ता, खाटीक गल्ली, पॉवर हाऊस, बुरूमतळी, भोगाळे आदी परिसरात ही स्वच्छता मोहीम राबवली. श्री सदस्यांनी या अभियानातून १२.३ किमीचे रस्ते तर १६ हजार ७४१ चौसेमीचा शासकीय परिसर चकाचक केला. त्यातून ७ हजार २०० किलो ओला कचरा, २५ हजार ७०० किलो सुका कचरा असा एकूण ३२ हजार ९०० किलो म्हणजेच ३२ टन ९०० किलो कचरा गोळा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT