Narendra Modi and Eknath Shinde sakal
कोकण

Narendra Modi: केंद्रात पुन्हा मोदी सरकार आणू; शिवसेनेच्या मंत्र्याने दिले पदाधिकाऱ्याना निर्देश

सकाळ डिजिटल टीम

Modi: आगामी निवडणुकीमध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. निवडून आलेल्या सर्व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य द्या, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

त्यांच्या हस्ते दोडामार्ग, वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यांतील नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, नितीन मांजरेकर, राजेंद्र निंबाळकर, आबा केसरकर, विनायक सावंत आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये गावात ग्रामविकास आघाडीतून निवडून आलेल्या सरपंच तारामती नाईक यांनी मंत्री केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

त्यांच्याबरोबर चंद्रकांत नाईक, उमेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत, चंद्रकांत सावंत, बाबूराव सावंत, उत्कर्षा नाईक, योगेश धुरी यांनी पक्ष प्रवेश केला.
दोडामार्ग तालुक्यातील साटेली ग्रामपंचायत सरपंच छाया धरणे, सदस्य राजन सावंत, कुडासे सरपंच श्रद्धा नाईक, उपसरपंच राजेंद्र गवस, सदस्य अमिता राणे, विवेक पालव, सानवी दळवी, शिरंगे उपसरपंच संजय गवस, प्रशांत गवस, मानसी घाडी, महिमा घाडी, प्रदीप नाईक, वेंगुर्ले तालुक्यातील खानोली उपसरपंच सचिन परब, सदस्य लाडोबा मेस्त्री, रुपा प्रभुखानोलकर, अमिता खानोलकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘आगामी काळामध्ये विकासकामांसाठी सर्वतोपरी निधी देण्यात येणार आहे. दोडामार्ग व वेंगुर्ले येथील दीडशे कोटी रुपयांची पाणीयोजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. ग्रामपंचायतीत पक्षीय राजकारण येऊ नये.

निवडून आल्यानंतर आता ग्रामस्थांना सेवा देण्याचे काम करा. विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल, चांगले काम करण्याचे कार्य तुमच्या हातून घडो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस चांगले काम करत आहेत.’’

दोडामार्ग पं. स. इमारत भूमिपूजन डिसेंबरमध्ये
दोडामार्गात पंचायत समिती इमारतीचे भूमिपूजन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

सावंतवाडी-माडखोल रस्त्याचे कामही पुन्हा करून घेणार असल्याचे यावेळी शिक्षणमंत्री केसरकर यांनी सांगितले. यावेळी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा केसरकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT