MP Sambhaji Raje Chhatrapati handed over the demand statement to Union Social Justice Minister Thavarchand Gehlot kolhapur marathi news 
कोकण

सचिन वाझेंनी वर्षा बंगल्यावर वास्तव्य केले ;  राणेंचा खळबळजनक दावा

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : सचिन वाझेंनी वर्षा बंगल्यावर वास्तव केले असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी आज (रविवार) एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे आरोप केलेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. 

आज (रविवार) एका वृत्त वाहिनीशी बोलताना राणे म्हणाले, सर्वात पहिला तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. परमबीर यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री यांच्यावर नाही तर ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. आयुक्त काय करताहेत हे गृहमंत्र्यांना माहित नाही का असाही टाेला राणेंनी लगावला आहे.

आयुक्तांच्या पत्राची चौकशी करायला एवढा वेळ लागतो.

 पुढे राणे म्हणाले, वाझें यांनी वर्षा बंगल्यावर वास्तव्य केले होते. ते गृहमंत्र्यांना नाहीतर मुख्यमंत्र्यांना नियमित माहिती पुरवत होते. वाझें यांनी कोणासाठी आणि का एन्काउंटर केले आहेत याची माहिती माझ्याकडे आहे असा दावा ही केला आहे.सचिन वाझे यांना मर्डर केसमध्ये वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मिळताच अनिल देशमुखांवर कारवाई का नाही केली? त्यांना मुख्यमंत्र्यांनी का निलंबित केलं नाही? असे ट्टिट ही त्यांनी केले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT