narayan rane ,uddhav thackeray 
कोकण

'आपल्याच वहिनीवरती ॲसिड फेकण्यास कोणी सांगितलं?'

टप्प्याटप्प्यानं सर्व प्रकरणं बाहेर काढणार; राणेंचा शिवसेनेला इशारा

अर्चना बनगे

रत्नागिरी: केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला. दरोडेखोरांना अटक करावी तशी मला अटक केली. दादागिरी करू नका वाट्याला जाऊ नका, मी टप्प्याटप्प्याने प्रकरण बाहेर काढणार आहे. असा सूचक इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. रत्नागिरीत जन आशीर्वाद यात्रे दरम्यान ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, घरात बसून आम्हाला कारभार करायचा नाही.आपल्याच वहिनीवरती ॲसिड फेकायला कोणी सांगितलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना व्हायरस ची उपमा दिली . याला प्रत्युत्तर म्हणून, नारायण राणे यांनी जुन्या प्रकरणाला हात घालत गंभीर आरोप केला.

गेल्या दोन दिवसात काय प्रकार झाला आहे तुम्ही पाहताय, सहा सात -तास लोकं रस्त्यावरती थांबली हे यांच्या नशिबात नाही. पूर्वी घडलेल्या घटनेवरती पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मी बोललो. दोन-अडीचशे पोलीस फौज घेऊन केंद्रीय मंत्र्याला अटक केली. काय पराक्रम केला. महाराष्ट्राची जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये लोक मरण पावत असतील तर, यांना पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत असा खडा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, कसली भाषणं करता, फक्त माझा घसा ठीक होऊ दे. तुम्हाला जे करायचे ते करा. दोन वर्ष झाली शोधताय तुम्हाला काय मिळालं? आम्हालाही जुन्या गोष्टी माहीत आहेत. संस्काराच्या भाषा करतांय आणि आपल्याच वहिनी वरती ॲसिड फेकताय. नाव न घेता राणेंनी केले खळबळजनक वक्तव्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

Women’s Premier League: महिला प्रीमियर लीगचा धडाका आजपासून; डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार पहिला टप्पा !

Tiger Reserve New Rules : आता वाघाचा फोटो काढणं पडणार महागात! ‘या’ व्याघ्र प्रकल्पाने लागू केले कडक निर्बंध, काय आहेत नवे नियम?

Latest Marathi News Live Update : ‘अजूनही वेळ आहे, काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावेत’ हसन मुश्रीफ यांचा सतेज पाटीलांना इशारा

SCROLL FOR NEXT