narayan rane criticism on maharashtra government
narayan rane criticism on maharashtra government 
कोकण

कोकणातील अकराही आमदारांना घरी बसविणार ; नारायण राणे

अजय सावंत

कुडाळ- आम्ही ठरवलयं, जिल्ह्याचा विकास थांबता कामा नये. हा विकास पुर्ववत चालू राहीला पाहीजे. हे सरकार विकासासाठी काही देणार नसेल तर या सरकारच्या विरोधात प्रसंगी आंदोलन उभारू, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी देत कोकणातील अकराही आमदारांना घरी बसविणार असे ठामपणे सांगितले. 

कुडाळ येथील वासुदेवानंद सरस्वती ट्रेड सेंटर येथे खा. नारायण राणे, माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी जिल्हा कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यानंतर खा. राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, आ. नितेश राणे, माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, संध्या तेरसे उपस्थित होते. 

यावेळी खा. राणे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला खाली उतरविण्यासाठी आणि शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी भाजपने कार्यक्रम आखला आहे. केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजना देशभर लागू केली आहे. केंद्राच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवून भाजप कशा पध्दतीने काम करत आहे आणि आताचे राज्य सरकार  एकही काम न करता जनतेची कशा प्रकारे दिशाभुल करत आहेत, याबाबतचे मार्गदर्शन केले. 

सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर येवून गेलेल्या राज्यमंत्री सत्तार यांना  मी 40 वर्ष ओळखतो. महसुलमंत्री काँग्रेसचे आणि हे राज्यमंत्री शिवसेनेचे यांना कोण ओळखतयं? असा सवाल यावेळी उपस्थित करत आंबोली येथील कबुलायतदार प्रश्न कसा सुटेल? पंधरा दिवसात हा प्रश्न सुटला असता तर इतकी वर्ष राहिला असता का? खरं तर हा प्रश्न कॅबिनेट मध्ये  जावा लागतो. तेथील लोकांनी कोर्ट कचर्‍या  केल्या आहेत, त्याचा अभ्यास करणे  आवश्यक असल्याचे सांगितले. कोकणात सत्तेत असलेले अकरा आमदार आहेत. त्या पैकी एकही आमदार  कोकणच्या विकासाबाबत सभागृहात बोलत नाही. कोकणातील पाटबंधारे, रस्ते, शाळा, कोरोना, एअरपोर्ट, सिवर्ल्ड या प्रश्नाबाबत या आमदारांना बोलताना कोणी ऐकल का? हे सर्व आमदार काहीही करू शकत नाहीत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तर निष्क्रीयचं आहेत. 1 डिसेंबरला जवळपास आमचं मेडीकल कॉलेज सुरू होत आहे. मेडीकल कॉलेजसाठी जमीन, आर्थिक तरतुद, परवानग्या मिळणे आवश्यक आहेत. या परवानग्यांचा अधिकार राज्याला नव्हे तर केंद्राला आहे, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहित नाही. मेडीकल कॉलेजसाठी किती पैसे लागतात? हे येथील पालकमंत्र्यांना जरा विचारा, 250 कोटी रूपये हॉस्पिटलसाठी लागतात ते पैसे हे सरकार देणार का? असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या मेडीकल कॉलेज प्रश्नी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

यावेळी राणे म्हणाले की, सिंधुदुर्गात पर्यटकांनी यावे, खर्च करावा तो पैसा येथील जनतेच्या उपयोगात पडावा हा आमचा उद्देश आहे. बंदर विभागाने येथील व्यवसायिकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यवसायिकांना भाजप संरक्षण देईल. त्यावेळी  शिवसेना किंवा कोण अधिकारी अडवायला येतात ते आम्हाला पाहायचचं आहे.  चिपी विमानतळही आम्हीच सुरू करणार आहोत. कारण केंद्रीय मंत्री आमचे आहेत. कोरोना कमी होताच केंद्रीय मंत्र्यांकडे जावून हे विमानतळ सुरू करू. विरोधक विमानतळ चालू करू शकत नाहीत, ते फक्त गणपतीचं आणू शकतात, असा टोलाही कोणाचेही नाव न घेता लगावला. कोकणातील धरण प्रकल्पही या सरकारने थांबविले असल्याचेही यावेळी राणे यांनी सांगितले. 


यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले, जिल्हा कार्यकारणीच्या  बैठकीत राज्यात महिलांच्या अत्याचार प्रश्नी राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. कामगार कायद्याची माहिती दिली. तसेच येणार्‍या निवडणुकीत शतप्रतिशत भाजप जिंकेल असा निर्णय घेण्यात आला. मच्छिमार्‍यांसाठी पॅकेज आणि भात नुकसानीसाठी केवळ 100 रूपये गुठ्ठा मोबदला या राज्यशासनाच्या निर्णयावरही चर्चा झाली. कृषि विधेयकाबाबतही चर्चा करून सर्वसामान्य जनतेला फायदा होण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून भाजप प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT