narayan rane criticize on shivsena on the topic of kokan politics in sindhudurg 
कोकण

'आयत्या बिळावर नागोबा सारखे यायचे याला शिवसेना म्हणतात'

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : विकासकामाला विरोध करायचा आणि उद्घाटनाच्या वेळी 'आयत्या बिळावर नागोबा' सारखे यायचे याला शिवसेना म्हणतात, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. 

राणे म्हणाले, या कॉलेजचे बांधकाम सुरु करत असताना पहिला विरोध शिवसेनेने केला होता. उद्घाटन प्रसंगी नवीन हॉस्पिटल मंजूर करू आणि त्याला ९०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासनही त्यावेळी शिवसेनेने दिले होते. मात्र यांच्या तिजोरीत एकही पैसा नाही आणि हे ९०० कोटी कसे काय देणार? अशी टिकाही त्यांनी केली. 

कोकणात चिपी विमानतळ तयार आहे. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी रोज उद्घाटन होणार म्हणून सांगतात. परंतु जेव्हा मी विमानतळाचे काम सुरू केले, तेव्हा पहिले आंदोलन आणि विरोध शिवसेनेने केला होता याची आठवणही राणे यांनी करून दिली. 

यावेळी नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण घ्या आणि देशासाठी, राज्यासाठी उत्तम डॉक्टर म्हणून नावारूपाला या, उत्कृष्ट निकाल मिळवून द्या असे आवाहन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT