narayan rane criticized on shiv sena on the topic of electricity bill in ratnagiri 
कोकण

'आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा अंडरग्राउंड ; ‘मातोश्री’वरून बटण दाबले गेले, की ते सहभागी होतात'

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (रत्नागिरी) : एकीकडे शिवसेना वीजबिल माफी जाहीर करते; तर दुसरीकडे महाविकास आघाडी राज्यातील ७१ हजार वीज ग्राहकांची वीजतोडणी करणार आहे. ही जनतेची फसवणूक आहे. त्यामुळे या विरोधात भारतीय जनता पक्ष आंदोलन छेडणार आहे, असा इशारा भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी दिला.
पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना खासदार राणे यांनी लाल किल्ल्यावरील भारत ध्वज उतरवित खालिस्तानचा ध्वज लावण्यात आला, हे शेतकरी आंदोलन करणाऱ्या १६ राजकीय पक्षांना योग्य वाटते का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी अन्य पक्षाप्रमाणे आंदोलनात सहभागी झाली नाही, याकडे लक्ष वेधले असता शिवसेनेचा पाठिंबा अंडरग्राउंड होता. ‘मातोश्री’वरून बटण दाबले गेले, की ते सहभागी होतात, असा टोला मारला.

 राऊत यांच्यावर टीका

चिपी विमानतळसाठी जमीन संपादन करीत असताना विरोध करणारे आताचे खासदार विनायक राऊत त्याच विमानतळ उद्‌घाटनाच्या तारखा शोधत आहेत. मात्र, रस्त्यासाठी आवश्‍यक ३२ कोटी हे सरकार देऊ शकले नाहीत. रस्ते व पाणी या मूलभूत गरजा भागवू शकले नाहीत. जिल्ह्यात निधी आणला नाही. आता निधी आलाय. हा निधी एप्रिलमध्ये प्राप्त होऊन सप्टेंबरमध्ये खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप ती प्रक्रिया सुरू झाली नाही. परिणामी, ३१ मार्चला हा निधी मागे जाणार आहे, असे खासदार राणे यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT