narayan rane, uddhav Thackeray sakal media
कोकण

विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या; नारायण राणेंचे आवाहन

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) : आगामी काळातील सहकारातील निवडणूका, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, जिल्हा परिषदेत आपली सत्ता कायम राहीली पाहीजे. यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळात जावून निवडणूकीची तयारी करावी. मी तुमच्या पाठीशी आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या योजना सामन्य नागरिकांपर्यत पोहचल्या पाहीजेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन केंद्रीय लघु, सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

ओसरगाव येथील महिला भवन सभागृहात जिल्हा भाजपच्या कार्यकारिणी बैठक काल (ता.19) झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष जयदेव कदम, सरचिटणीस प्रभाकर सावंत, अशोक सावंत, महिला आघाडी अध्यक्षा संध्या तेरसे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राणे हे गणेशोत्सवासाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याशी संवाद साधण्यासाठी पक्षाच्या बैठकीचे आयोजन केले होते. राणे म्हणाले, पक्षसंघटनात्मक बांधणी असल्यानेच निवडणुकीत यश मिळालेच पाहिजे. केंद्रातील मोदी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवा. माझ्या मंत्रालयाची कामे, रोजगार निर्मिती धोरणाची जनजागृती करा. देश आणि राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी संघटनात्मक बांधणी आदर्शवत राहिली पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याला यश मिळवलं पाहिजे. निवडणूकीत उमेदवार कोणीही असेल; मात्र पक्षासाठी सर्वांनी काम केले पाहिजे जर पक्ष असेल तर आपण सर्व असणार आहोत. याचे भान सर्वांनी राखले पाहिजे. त्या ठिकाणी अंतर्गत गटबाजी न करता एकजुटीने विरोधकांचा पराभव करण्यासाठी कामाला कामाला लागा.

राणे म्हणाले, मी केंद्रात मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गात जन आशिर्वाद यात्रा घेऊन आलो. त्यावेळी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात मिळालेला प्रतिसाद पाहता आपली मेहनत दिसून येत आहे. मी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त करतो. कारण रात्री किती उशिरा गेल्यानंतर त्याठिकाणची गर्दी पाहता आणि उत्स्फूर्तपणे माझे स्वागत, जल्लोष केले,मी हे कदापि विसरणार नाही. माझा कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे.`यावेळी उपस्थितीत मान्यवरानीही मनोगत मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : जरा 'बडबड' कमी कर... वीरेंद्र सेहवागचा KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाला, बच्चन, तेंडुलकर यांच्याकडून शिक

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

SCROLL FOR NEXT