कोकण

चिपळूणात घोषणाबाजी; शिवसैनिक, भाजपा कार्यकर्ते आमनेसामने

- नागेश पाटील

दरम्यान शिवसेनेकडून जहरी निषेध केला जात असल्याने राणे समर्थक, भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

चिपळूण - केंद्रीय मंत्री नारायण राणे हे वालोपे येथून बहादूरशेख नाका येथे येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यावर केलेल्या टीकेवरून शिवसैनिकांनी राणे यांच्या विरोधात आक्रमक झाले. दरम्यान शिवसेनेकडून जहरी निषेध केला जात असल्याने राणे समर्थक, भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनीही शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावरून चिपळुणात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

बहादूर शेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विरोधात घोषणा दिल्यामुळे शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस अधीक्षक गर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही परिस्थिती कुशलतेने हाताळली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील पथक चिपळुणात रवाना झाले होते. दरम्यान मंत्री राणे सायंकाळीच चिपळूणात दाखल झाले.

सकाळी साडेदहाच्या सुमारास राणे यांचे बहादूर शेख नाका येथे आगमन झाले. राणे येण्यापूर्वीच वीस-पंचवीस शिवसैनिकांचा जमाव बहादूर शेख नाका येथे आला. त्यांना चिपळूण कराड मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगत असलेल्या फुलावरच पोलिसांनी रोखले. त्यावरून पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये काही प्रमाणात वादावादी झाली. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी राणेंविरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान काही वेळातच नारायण राणे यांचे वालोपे येथून बहादूर शेख नाका येथे आगमन झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

विविध संघटनांनी व भाजप पदाधिकारी नेत्यांचा सत्कार केला, स्वागत केले. याचवेळी समोरून शिवसैनिकांची तीव्र स्वरूपाचे घोषणाबाजी सुरू असल्याने राणेसमर्थक आणि भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनीही रस्त्यावर येऊन शिवसैनिकांनी विरोध शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिस अधीक्षक गर्ग व त्यांचे सर्व सहकारी दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. बहादूर शेख नाका इथून राणे अभिरुची हॉटेल अभिरुची येथील बैठकीसाठी गेल्यानंतर वातावरण काहीसे निवळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींना या देशाबद्दल किंवा इथल्या लोकांबाबत अजिबात आदर नाही- भाजप खासदार प्रदीप कुमार सिंग

Maratha Reservation: टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच: मनोज जरांगे- पाटील; प्रमाणपत्र रद्द करून जातीयवादी भूमिका

SCROLL FOR NEXT