Vishal Parab sakal
कोकण

Vishal Parab : मोदींचे विचार तळागाळात पोहचविणार

भाजपच्या नेत्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी लवकरच राज्याचा दौरा करणार.

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - भाजपच्या नेत्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी लवकरच राज्याचा दौरा करणार, अशी माहिती भाजपचे महाराष्ट्र युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे दिली.

श्री. परब यांनी आज येथील भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, जितेंद्र गावकर आदी उपस्थित होते.

श्री. परब पुढे म्हणाले, ‘भाजपची युवा फळी मजबूत करण्याची जबाबदारी आज माझ्यावर आली आहे. ती पार पाडण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्या माध्यमातून लवकरच राज्यभर दौरा करून जास्तीत जास्त युवा वर्ग भाजपकडे कसा वळेल, यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. एकूणच ज्या हेतूने माझ्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तो साध्य करत माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणार आहे.

आज केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून ज्या योजना, सोयी सुविधा सर्वसामान्यांसाठी आहेत, त्या जनतेपर्यंत पोहोचवीत पंतप्रधान मोदींचे विचार तळागाळात नेण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. हे काम करत असताना जिल्ह्यातील माझे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार राजन तेली, सर्वच नेतेमंडळीचे मार्गदर्शन आणि सहकार्य घेणार आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘राज्यात युवा वर्ग व्यसनाधीनतेकडे वळत आहे, ही शोकांतिका आहे. मात्र, या युवा वर्गाला काम देऊन त्यांना सक्षम स्वतःच्या पायावर उभे करत व्यसनाधीनतेपासून रोखण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्याकरिता भविष्यात जिल्ह्यात रोजगार आणण्यासाठी भाजपच्या माध्यमातून प्रयत्न असेल.

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपने मोठी जबाबदारी देऊन माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल केंद्रातील राज्यातील व जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानतो.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रवाशांनी भरलेल्या जहाजाला आग! लेकराला मिठीत घेऊन वडिलांनी थेट समुद्रात उड्या मारल्या... हृदय हेलावणारे व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : खासदार सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत गोंधळ ला

Solapur Crime: 'चारित्र्याच्या संशयासह पैशासाठी विवाहितेचा छळ'; चौघांवर गुन्हा, व्हाट्स ॲपवर पाठवले मेसेज

Pune: पुण्यात मर्सडीज आणि स्विफ्ट कारचा अपघात, नंतर प्रकरण चिघळलं, भरपाईसाठी महिलांना मारहाण अन् चिमुकल्याला उचलून नेलं

Baramati Accident: दुचाकींची धडक, दोघांचा जागीच मृत्यू; घरच्यांचा मन हेलावणारा आक्रोश

SCROLL FOR NEXT