National Highway for safety .. Lata kamblera death fasting
National Highway for safety .. Lata kamblera death fasting 
कोकण

राष्ट्रीय महामार्ग सुरक्षिततेसाठी.. लता कळंबेंचे आमरण उपोषण

अमित गवळे

पाली : पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच (एमएसआरडीसी) पुर्णतः जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी केला आहे. या मार्गाच्या सुरक्षितेतेकरीता व एम.एस.आर.डी.सी. च्या गलथान कारभाराच्या विरोधात त्या सोमवारी (ता.१८) दुपारी महामार्गालगत असलेल्या घोड्याचा डोह गावाजवळ आमरण उपोषणास बसल्या आहेत.

पाली खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ (अ) या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. परिणामी हा मार्ग वाहतुक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक व जिवघेणा झाला आहे.  हे आमरण उपोषण कोणत्याही एका गावासाठी किंवा केवळ एका तालुक्यासाठी नसून याचा प्रामाणिक उद्देश समाजहित व लोकसेवा हा आहे. या आंदोलनाला कोणताही राजकीय संदर्भ नाही. या महामार्गावर होणारी अवजड व ओव्हरलोड वाहतुक व वाहनांची वर्दळ जिवघेणी ठरत असून अपघाताला निमंत्रण देत आहे. रस्ता रुंदिकरणादरम्यान ठिकठिकाणी रस्ता फोडून काम केले जात आहे. हे काम करीत असताना सबंधीत ठेकेदाराकडून रस्ता सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असून याकडे एम.एस.आर.डीचे सोईस्कर व जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. असे कळंबे यांचे म्हणणे आहे.

धोकदायक रस्ता...
या आधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा मार्ग सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महांडळाच्या(एम.एस.आर.डी.सी) च्या अखत्यारीत सोपवण्यात आला आहे. या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे, दगडगोटे, चिखल आदी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशी नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या नादुरस्त रस्त्यामुळे अपघाती घटनांचे प्रमाण देखील वाढत आहे. तसेच रस्त्यालगत काम सुरु असल्याचे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही सुचनाफलक अथवा दुभाजक लावण्यात आलेले नाहीत. तर एका बाजूचा रस्ता उंचवट्यावर तर नव्याने बनविला जाणारा रस्ता १० ते २० फूट खोदला असल्याने वाहने रस्त्यावरुन खाली पडून अात्ता पर्यंत घडलेल्या अपघात आजवर अनेकांनी प्राण गमावले आहे. पावसामुळे तर या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT