Nature cyclone positive impact story in mandangad ratnagiri 
कोकण

त्या बनल्या गावासाठी आरोग्य देवदूत ; केली संपूर्ण गावाची वैद्यकीय तपासणी अन्

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : निसर्ग चक्री वादळात तालुक्यातील अनेक गावांप्रमाणे मंडणगड तालुक्यातील कुडुक बुद्रुक गावालाही प्रचंड मोठा फटका बसला. बोरीचा कोंड येथील १०० टक्के घरे उध्वस्त झाली. कपडेलता, अन्नधान्य भिजून गेले. त्यातच पाऊस सुरू असल्याने गावकऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली. अशा वेळी सामाजिक सेवेने प्रेरित असणाऱ्या डॉ.कावेरी वसंत रसाळ या मुंबईतून गावी येत गावकऱ्यांसाठी आरोग्य देवदूत बनल्या आहेत. तीन दिवस संपूर्ण गावातील नागरिकांची सर्व तऱ्हेच्या आजाराची तपासणी केली. याकामी रसाळ कुटुंबाने पुढाकार घेत गाव मंडळाच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम यशस्वी केला. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.


 डॉ.कावेरी रसाळ या एमडी आहेत. मुंबईसारख्या नेपियन्सी रोड, वाळकेश्वर परिसरात त्या वैद्यकीय सेवा बजावत आहेत. समाजसेवा वृत्तीचे वडील वसंतशेठ रसाळ यांच्याकडून सामाजिक सेवेचा वारसा त्यांना मिळाला आहे. निसर्ग आपत्तीत कुडुक गावाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. आप्तकाळात धावपळीत गावातल्या अनेकांना शाररिक इजा झाली. तसेच वृद्ध नागरिकांचे जुने आजार बळावण्याची शक्यता वाढली.

उपचार घेण्यासाठी देव्हारे किंवा मंडणगड येथे जावे लागणार असल्याने व प्रवासी वाहतूक बंद असल्याने नागरिकांकडून उपचार घेण्यासाठी टाळाटाळ होणार हे निश्चित होते. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर व रसाळ कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळाल्याने डॉ.कावेरी रसाळ आपल्या वैद्यकीय टीमसह गावी आल्या. गावातील सर्व नागरिकांची तीन दिवस आरोग्य तपासणी केली. लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांच्या विवीध आजारांचे निदान करताना त्यावर लागू होणारी औषधेही मोफत पुरविण्यात आली.

वृद्ध, आजारी नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. आपल्या गावातीलच डॉक्टर लेकीकडून वैद्यकीय सुविधा व औषधें मिळाल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. तसेच रसाळ कुटुंबाच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले असून आपत्तिकाळात धावून आलेल्या डॉ.कावेरी रसाळ या कुडुक बुद्रुक गावासाठी आरोग्य देवदूत ठरल्या आहेत. या वैद्यकीय शिबिरासाठी भक्ती रसाळ, नयन रसाळ, तुषार रसाळ, माधुरी रसाळ, विकास रहाटे, सचिन रसाळ, पूनम रसाळ, प्रिया रसाळ यांनी विशेष सहाय्य केले असून नवतरुण विकास मंडळ मुंबई व ग्रामीण पदाधिकारी, सदस्यांनी नियोजनात्मक सहकार्य केले.काही

हेही वाचा-सुखद ! पंधराशे मेट्रिक टन खत रत्नागिरीत दाखल 

अजूनही ग्रामीण भागात अपेक्षित वैद्यकीय सुविधा पोहचल्या नाहीत. परिणामी वैद्यकीय सेवा घेण्यासाठी तीन किमीची चालत जावे लागते. पूर्वीपासून इच्छा होती आपण आपल्या गावातील नागरिकांसाठी काहीतरी करावं. निसर्ग चक्रीवादळांतर पाहणी करायला आले असता, जाणीव झाली आता या परिस्थितीत वैद्यकीय सेवेची नितांत गरज आहे. कुटुंब, सहकारी व ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने वैद्यकीय शिबिर घेत सेवा दिली. भविष्यात आवश्यकतेनुसार तालुक्यात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबविण्याचा मानस आहे.
- डॉ.कावेरी वसंत रसाळ, एमडी मुंबई.

गावातील नागरिकांना उपचाराची गरज असताना डॉ.कावेरी रसाळ व त्यांच्या वैद्यकीय टीम धावून आली. सर्वांना वैद्यकीय सेवा, औषधे व अन्नधान्य किट मोफत दिल्याने या आप्तकाळात रसाळ कुटुंबाने गावासाठी दिलेले हे सेवाभावी योगदान महत्वपूर्ण आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार.
- प्रफुल्ल अबगुल, मुंबई मंडळ पदाधिकारी.

गावातील सुशिक्षित पिढीने आप्तकालीन परिस्थितीत गावासाठी दिलेले हे योगदान आणि सेवा बहुमूल्य आणि तालुक्यासाठी प्रेरणादायी आहे. नवतरुण विकास मंडळाच्या वतीने त्यांना धन्यवाद.
- विकास रहाटे, मुंबई मंडळ अध्यक्ष.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT